घरमनोरंजनयोगा टिचर ते बाहुबलीची देवसेना असा आहे अनुष्काचा प्रवास

योगा टिचर ते बाहुबलीची देवसेना असा आहे अनुष्काचा प्रवास

Subscribe

अभिनेत्री अनुष्का शेट्टी हीचा आज ४१ वा वाढदिवस आहे. आज अरबोंची मालकीन असलेली अनुष्का कधीकाळी योगा क्लासेस शिकवून त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवतं होती.

बाहुबली या दाक्षिणात्य सुपर डुपर हीट सिनेमात देवसेनेची भूमिका करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी हीचा आज ४१ वा वाढदिवस आहे. अनुष्का ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला असा मौल्यवान हिरा आहे की ती ज्या चित्रपटात काम करते तो सुपर डुपर होणार याची खात्री असते. पण अनुष्काचा हा यशाचा प्रवासही तेवढाच खडतर आहे. आज अरबोंची मालकीन असलेली अनुष्का कधीकाळी योगा क्लासेस शिकवून त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवतं होती.

- Advertisement -

अनुष्काने भरत ठाकुर यांच्याकडून योगाचे शिक्षण घेतले. नंतर ती योगा प्रशिक्षक झाली. याचदरम्यान, दिग्दर्शक मेहर रमेश यांची नजर अनुष्कावर पडली. त्यांनी तिला थेट सिनेमाची ऑफर दिली.

- Advertisement -

तिने ‘सुपर’ आणि ‘महानदी’ या सिनेमात काम केल. पण दोन्ही सिनेमे चालले नाही. त्यानंतर अनुष्का पुन्हा आपल्या गावी जायला निघाली असता दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी तिला फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर अनुष्काने कधी मागे वळून बघितले. बाहुबली मधील देवसेनेच्या भूमिकेने देशातच नाही तर परदेशातही अनुष्का लेकप्रिय झाली.

आज अनुष्काची १४० कोटींची मालमत्ता असून हैदराबाद येथील जुबानी हिल्स या महागड्या अपार्टमेंट ६ व्या मजल्यावर तिचा आलिशान फ्लॅट आहे. ‘सिंघम’, ‘रुद्रमहादेवी’, ‘अरुंधती’ आणि ‘वेदम’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे तिने दिले आहेत. अनुष्का दाक्षिणात्य सिनेमात सर्वात अधिक मानधन  घेणारी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी अनुष्का ४ ते ५ कोटी रुपये घेते. तिला कार आणि बाईक्सचे क्रेझ असून ऑ़़डी ए ६,बीएमडब्ल्यू ६ आणि टोयटा कोरोला अनुष्काच्या प्रिय कार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -