अनुष्काने वाढदिवसानिमित्त विराटला दिल्या हटके शुभेच्छा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अनुष्काच्या या पोस्टवर क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

virat kohli and anushka sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharma) तिचा पती आणि क्रिकेटर विराट कोहली यांचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर त्याच्या वाढदिवसानिम्मित शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने विराटसाठी एक खास पोस्ट सुद्धा लिहीली आहे. या फोटोमध्ये विराटाचे वेगवगेळे फोटो पाहायला अमलात आहेत. अनुष्काने वामिकाचाही एक फोटो शेअर केला आहे. (Happy Birthday Virat Kohli)

अनुष्का शर्माने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” विराट आज तुझा वाढदिवस आहे. त्यामुळे साहजिकच मी या पोस्टसाठी तुझे उत्तम फोटो निवडले आहेत. प्रत्येक स्थितीत, रूपात आणि परिस्थितीत माझे तुझ्यावर प्रेम आहे.” अनुष्काने पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनेक रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहेत. अनुष्काच्या या पोस्टवर क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 अनुष्का शर्माच्या या पोस्टवर खुद्द विराट कोहलीनेही हसणारे आणि रेड हार्ट इमोजी देत कमेंट केली आहे. अभिनेत्री राधिका आपटेने रेड हार्ट आणि हसणारा इमोजी कमेंटमध्ये दिले आहे. क्रिकेटर एव्ही डिव्हिलियर्सने हसणाऱ्या इमोजीसह ‘तो चेहरा’ असे कमेंट मध्ये लिहिले आहे.

विराट कोहलीचा आज वाढदिवस आणि क्रिकेट प्रेमींसाठी आणि विराटच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. विराटाचे चाहते सुद्धा सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विराट सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तो T20 क्रिकेट विश्वचषक खेळत आहे. या सामन्यातील त्याची कामगिरी अप्रतिम आहे.