घरमनोरंजनअनुष्काचा पुतळा 'बोलणार'!

अनुष्काचा पुतळा ‘बोलणार’!

Subscribe

इन्स्टाग्रामवर अनुष्काच्या फॅन्सनी ही बातमी तिच्या फोटोसह पोस्ट केली आहे. यात तिच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचे दिसत आहे. याचाच अर्थ असा की, तिच्या पुतळ्यासाठी तिची मापे घेण्यात आली आहेत.

अनुष्काच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी! लवकरच अनुष्काचा बोलका पुतळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सिंगापूरमधील मादाम तुसाँ या वॅक्स म्युझिअममध्ये तिचा हा बोलका पुतळा ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा पहिली अभिनेत्री असणार आहे जिचा बोलका पुतळा या संग्रहालयात ठेवला जाणार आहे. लंडनमधील मादाम तुसाँमधील वॅक्स म्युझिअममध्ये अनेक बॉलीवूड अभिनेत्यांचे पुतळे आहे. शिवाय सिंगापूरमधील म्युझिअममध्ये देखील सेलिब्सचे पुतळे आहेत. पण असा बोलका पुतळा ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून अनुष्काची यात वर्णी लागली आहे.

तिच्या फॅन्सनी दिली माहिती

इन्स्टाग्रामवर अनुष्काच्या फॅन्सनी ही बातमी तिच्या फोटोसह पोस्ट केली आहे. यात तिच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचे दिसत आहे. याचाच अर्थ असा की, तिच्या पुतळ्यासाठी तिची मापे घेण्यात आली आहेत. तिचा हा फोटो पोस्ट करत तिच्या फॅन्सनी तिचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

असा असेल पुतळा

सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीचा बोलका पुतळ्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यात अनुष्का शर्माच्या हातात एक फोन असणार आहे. तिच्या समोर देखील एक फोन ठेवला जाणार आहे. तुम्ही रिसीव्हर कानाला लावल्यावर तुम्हाला ती शुभेच्छा देणार आहे, अशी प्राथमिक माहिती संग्रहालयाकडून देण्यात आली आहे. पण तरीदेखील हा बोलका पुतळा कसा असणार ही उत्सुकता आहे.

- Advertisement -

‘रब ने बना…’ पासून केली सुरुवात

अनुष्का शर्माने आपल्या करीअरची सुरुवात शाहरुख खान सोबत ‘रब ने बना दी जोडी’ पासून केली. ‘पीके’, ‘NH10’, ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘फिल्लुरी’, ‘परी’ यासारख्या सिनेमातून तिच्या अभिनयाची वेगळीच बाजू बघायला मिळाली. सध्या ती सुई-धागा या तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. वरुण धवन या सिनेमात तिचा को-स्टार असून या सिनेमाच्या शुटींगदरम्यान काढलेले अनेक फोटो तिने स्वत: शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -