Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन राजकारणात कोणीही कोणाचे... सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?

राजकारणात कोणीही कोणाचे… सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?

Subscribe

सोशल मिडियावर सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडिओ जबरजस्त व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. यामध्ये त्याचे विधान असे आहे कि ‘प्रामाणिकपणा हा फक्त कुत्र्यांनाच शोभा देतो.. राजकारणात वेळ आली की सत्तेसाठी कुणाचे पायही दाबावे लागतात तर कुणाचा गळाही..’ कालपासून या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

अशातच आता बहुचर्चित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारण व सत्तासंघर्षावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचे दोनही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक आतुर आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

Hotstar Specials City Of Dreams | Season 3 | Trailer | Priya Bapat | Atul Kulkarni - YouTube

पक्षापक्षातील राजकारण, सत्तेसाठी कपडे बदलावे तसे पक्ष बदलणारे लोक आणि त्यांना खरेदी करणारे पक्ष यामुळे निष्ठा काय असते हा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर हे विधान समोर आल्याने मोठी चर्चा होत आहे. पण हा व्हिडिओ नेमका कसला आहे? हे पाहूया..

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सीरिजच्या नवा प्रोमोही सर्वांना वेड लावत आहे. सिटी ऑफ ड्रीम्स ३’च्या नव्या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर काही डायलॉग देताना दिसत आहेत. “साहेबांच्या निवृत्तीचा काही भरवसा नाही.

राजकारणात प्रत्येकाला स्वत:चा विचार करावाच लागतो. पक्ष व साहेब दोघांचीही मी खूप सेवा केली. पण साहेब त्यांच्या मुलीलाच मेवा देणार. इमानदारी फक्त कुत्र्यांनीच करावी. राजकारणात कोणीही कोणाचे पाय दाबण्यासाठी नाही तर सत्तेसाठी येतात. मग यासाठी तुम्हाला कोणाचे पाय दाबावे लागू दे अथवा गळा,” असं म्हणताना सचिन पिळगावकर दिसत आहे.

City Of Dreams | Season 3 | Coming Soon | Priya Bapat | Atul Kulkarni | DisneyPlus Hotstar - Bollywood Hungama

OTT प्लँटफोर्मच्या डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट, सचिन पिळगावकर, एजाज खान, अतुल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’ हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच ही वेब सीरिज हिंदी व मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत

- Advertisment -