Aparna P Nair Death : मल्याळम इंडस्ट्रीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री अपर्णा पी नायर (Aparna P Nair) (31) यांचं गुरुवारी (31 ऑगस्ट) तिरुअनंतपुरममधील करमना येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. अपर्णा पी नायर या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Aparna P Nair Death Death of Malayalam actress Aparna Nair A body was found in a suspicious condition in the house)
हेही वाचा – राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुन यांच्यासोबत ‘पुष्पा 2 द रुल’ सेटची पहिली झलक सादर केली
मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री अपर्णा नायर यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना सकाळी 11 वाजता किल्लीपालम येथील एका खाजगी रुग्णालयातून मिळाली. त्यानंतर करमना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत अभिनेत्रीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अपर्णा पी नायर मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत मल्याळम टीव्ही इंडस्ट्री तसेच अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने केवळ मल्याळम फिल्म इंडस्ट्रीलाच नाही तर, तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना ठरला ऐतिहासिक; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
अपर्णा पी नायरची कारकिर्द
अपर्णा पी नायरने 2006 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. मल्याळम टीव्ही मालिका व्यतिरिक्त तिने तमिळ आणि तेलुगु चित्रपटचातही काम केले आहे. अपर्णाने तिच्या कारकिर्दीत ‘चंदनमाझा’, ‘आत्मसाखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’ आणि ‘देवा स्पर्शम’ यासारखे अनेक सुपरहिट टीव्ही मालिकेत काम केले आहे. टीव्ही मालिकेव्यतिरिक्त अभिनेत्रीने मल्याळम चित्रपटांमध्येही भरपूर काम केले. अपर्णाला मल्याळम चित्रपटसृष्टीत निर्माते लोहितादास यांच्या नैवेद्यम चित्रपटातून ओळख मिळाली. ‘चंद्रमुखी’मध्ये तिने पांचालीची भूमिका साकारली होती. 2009 मध्ये अपर्णाने मेघातीर्थममध्ये काम केले होते. 2010 मध्ये मल्याळम चित्रपट ‘कॉकटेल’ मध्ये काम केले. अपर्णा पी नायरच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट करून चाहते तिला आदरांजली वाहताना दिसत आहेत.