घरमनोरंजनॲपलचे CEO टीम कुक यांनी माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईतील वडापावचा आस्वाद

ॲपलचे CEO टीम कुक यांनी माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईतील वडापावचा आस्वाद

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे. माधुरी दीक्षितने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती वडा पाव खाताना दिसत आहे. गंमत म्हणजे माधुरी दीक्षित अॅपलचे सीईओ टिम कुकसोबत हा वडा पाव खाताना दिसत आहे. माधुरी दीक्षितच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. ( Apple CEO Tim Cook with Madhuri Dixit relishes vada pav in Mumbai )

माधुरी दीक्षितने टिम कुकसोबत फोटो शेअर करत लिहिले की, मुंबईत आल्यावर वडापावने स्वागत करण्यापेक्षा आणखी काहीच चांगले असू शकत नाही. फोटोमध्ये टीम यांनी पांढऱ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे. तर माधुरीने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे. त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

टीम कुक मंगळवारी मुंबईत भारतातील पहिले अ‌‌ॅपल स्टोअरचे उद्धाटन करणार आहेत. हे अ‌‌ॅपल स्टोअर मुंबईतील बीकेसी वांद्रा कुर्ला काॅम्पेलक्समध्ये सुरु होणार आहे. इतकंच नव्हे तर टीम भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनाही भेटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच टीम कुक यांचा हा भारत दौरा खास असणार आहे, यात काहीच शंका नाही.

( हेही वाचा: ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती )

- Advertisement -

माधुरीच्या पोस्टला टीम कुकने उत्तर दिले

माधुरीच्या या पोस्टवर टीम कुकनेही प्रतिक्रिया दिली आहे आणि लिहिले, माधुरी दीक्षित मला माझ्या आयुष्यातील पहिला वडा पाव खायला दिल्याबद्दल धन्यवाद, वडापाव खूप चवदार होता. दोघेही मुंबईच्या आलिशान फूड आउटलेटमध्ये बसले होते. मुंबईतील स्वाती स्नॅक्स या आलिशान फूड आउटलेटमध्ये माधुरी आणि टीमने या वडा पावाचा आस्वाद घेतल्याचे सांगितले जात आहे.

( हेही वाचा: धक्कादायक, पुण्यातील शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर, NIAकडून मोठी कारवाई )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -