Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन माधुरी दीक्षितकडून 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक

माधुरी दीक्षितकडून ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक

Subscribe

अभिनेत्री माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर पाहिले, हा ट्रेलर पाहिल्यावर माधुरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबाबत तिचं मत व्यक्त केले आहे.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या घायाळ अदांवर आजही करोडो चाहते फिदा होतात. तिच्या मोहक सौंदर्याने आणि सुंदर नृत्याने माधुरी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. माधुरी दीक्षितने ९० च्या दशकातील काळ गाजवला होता. माधुरीचे अनेक चित्रपट हिट झाले होते. सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी माधुरी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अमृता खानविलकरच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर पाहिले, हा ट्रेलर पाहिल्यावर माधुरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबाबत तिचं मत व्यक्त केले आहे. त्या स्टोरीमध्ये माधुरी म्हणाली की, ‘किती अप्रतिम ट्रेलर आहे, चंद्रमुखी चित्रपट मला नक्कीच पाहायला आवडेल.

- Advertisement -

माधुरी व्यतीरिक्त अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे कौतुक केले होते. इतकंच नव्हे तर कॉमेडियन भारती सिंहने सुद्धा या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या.

- Advertisement -

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून या चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमृता खानविलवर आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत लाभलेले आहे. सध्या चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे.

 

 

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ मध्ये विवेक ओबेरॉयची कडक एन्ट्री

- Advertisment -