टीव्ही मालिकांमधून प्रत्येकाच्या घरोघरी पोहचलेल्या अपूर्वा नेमळेकर हिच्या भावाचे गेल्या काही दिवसांआधीच निधन झाले. त्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला.अशातच आता पुन्हा तिची मोठी बहिण स्वामिनी नेमळेकर हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अपूर्वाने फेसबुकवर स्टेटस शेअर केले आहे. त्यात तिने बहिणीसाठी प्रार्थना करण्यासाठी आवाहन केले आहे.
अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, माझं जगं उध्वस्त होत चालले आहे. तरीही माझा प्रार्थनेवर विश्वास आहे. मला अशा आहे की, माझी बिण या संकटातून लवकरच बाहेर पडेल. तिला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. अखेर तिने जय जय श्री स्वामी समर्थ असे लिहिले आहे.
दरम्यान, याआधी सुद्धा अपूर्वाने आपल्या आयुष्यात खुप काही भोगले आहे. वडिलांचे निधन, नवऱ्यापासून विभक्त, भावाचे नुकतेच निधन आणि आता बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने ती अधिक खचली गेली आहे.
हेही वाचा: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन