Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनA.R.Rahman divorce : लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान यांचा घटस्फोट

A.R.Rahman divorce : लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान यांचा घटस्फोट

Subscribe

भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांनी देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे.

वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ शिवाय खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पोस्ट

एक्सवर (ट्विटर) ए आर रेहमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्नानंतर 30 वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकतं. असं असताना देखील आपण अर्थ शोधत असतो… आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’, ए. आर. रेहमान यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 29 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. 1995 मध्ये ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न झालं. त्यांना खतीजा, रहीमा या दोन मुली आणि अमीन हा मुलगा आहे. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने अरेंज मॅरेज केलं होतं. पण आयुष्यात कठीण वळण आलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -