मलायकाच्या ‘अरोरा सिस्टर्स’ कार्यक्रमात अरबाज खान आणि अर्जुन कपूर येणार समोरासमोर?

घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अशातच आता सांगण्यात येत आहे की, मलायकाच्या नव्या रियालिटी शो 'अरोरा सिस्टर्स'मध्ये अरबाज खान आणि अर्जुन कपूर दोघेही पाहुणे म्हणून आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.

बॉलिवूडमधील बोल्ड आणि स्टाइलिश अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, मलायका अरोरा तिच्या खाजगी आयुष्याबाबत फारसं बोलत नाही. मात्र आता मलायका तिच्या खाजगी आयुष्यावर व्यक्त होण्यासाधी पूर्ण पणे तयार आहे. लवकरच मलायका अरोराचा रियालिटी शो ‘अरोरा सिस्टर्स’ डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा शो मलायका तिची बहिण अमृता अरोरासोबत करणार आहे. या दोन्ही बहिणींना एकत्र पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक झाले आहेत.

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोराच्या आयुष्यामध्ये अनेक बदल झाले. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाजला आपल्या मुलाला एअरपोर्टवर ड्रॉप करताना पाहिलं गेलं आहे. तसेच घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अशातच आता सांगण्यात येत आहे की, मलायकाच्या नव्या रियालिटी शो ‘अरोरा सिस्टर्स’मध्ये अरबाज खान आणि अर्जुन कपूर दोघेही पाहुणे म्हणून आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘अरोरा सिस्टर्स’ या शोमध्ये मलायका अरोराचा पूर्व पती अरबाज खान आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. हे दोघेही या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. मात्र हे दोघे वेग-वेगळ्या भागात दिसतील. शिवाय या कार्यक्रमामध्ये अमृता आणि मलायकाचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र देखील सहभागी होतील.

मलायका आणि अरबाजचं कधी झालं लग्न?
1998 मध्ये मलायका आणि अरबाजचं लग्न झालं होत. लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

 


हेही वाचा :

आपल्या घरीही आई, बहिणी आहेत…चंदीगड व्हिडीओ कांड प्रकरणात अंकिताची पोस्ट चर्चेत