घरमनोरंजनअरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे 'साकीसाकी'वर ठुमके; व्हिडीओ व्हायरल

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे ‘साकीसाकी’वर ठुमके; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आता जॉर्जियाने साकी साकी वर ठुमके लावले आहेत. जॉर्जियाच्या दिलखेच अदांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

बॉलीवूडचा अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा बॉलीवूडमधील हिट गाण्यावर ठुमके मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जॉर्जियाने ‘साकी-साकी’ गाण्यावर चांगलाच ताल धरला आहे. अभिनेत्री नोरा फतेहीवर साकी साकी हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. आता जॉर्जियाने साकी साकी वर ठुमके लावले आहेत. जॉर्जियाच्या दिलखेच अदांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

- Advertisement -

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात जॉर्जिया आली. तर घटस्फोटानंतरही आपण चांगले मित्र असल्याचे मलायकाने सांगितले. एवढेच नाही तर मलायका नेहमी खान कुटुंबियांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असते. मलायका सुद्धा बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे. दोघांनीसुद्धा आपल्या नात्याची कबुली दिली आहे. शिवाय हे प्रेमी युगूल लवकरच विवाह करणार असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहेत.

View this post on Instagram

Wah wah @giorgia.andriani22 ???

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

- Advertisement -

जॉर्जियाची नवी वेब सिरीज

अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याच्या चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. अरबाजच्या कौटुंबिक कार्यक्रमांना जॉर्जिया नेहमीच हजरी राहताना दिसते. जॉर्जिया लवकरच ‘कैरोलाइन कामाक्षी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -