बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. या व्यतिरिक्त मलायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या मलायका तिच्या ‘मूविंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. हा एक रियालिटी शो असून यामध्ये मलायका तिच्या भूतकाळातील आयुष्य, वर्तमान आणि भविष्याबाबत मोकळेपणाने गप्पा मारताना दिसेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरबाजनने साजिद खानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अरबाजने मलायकासोबत पुन्हा लग्न करण्याची इच्छा असण्याचा खुलासा केला होता.
काय म्हणाला होता अरबाज खान?
नुकत्याच काही दिवसांपूर्वी साजिद खानच्या शोमध्ये अरबाज खान म्हणाला होता की,’लग्नाच्या 25 व्या वर्षी मला परत एकदा मलायकासोबत लग्न करायचे आहे.’ दरम्यान. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट होतात. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती.
2016 मध्ये वेगळे झाले मलायका आणि अरबाज
मलायका आणि अरबाज खानचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. 19 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज अनेकदा मुलासोबत एकत्र दिसून येतात. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे.
हेही वाचा :