घरमनोरंजन'बिग बॉस 17' च्या पार्टीमध्ये अरबाज-शूराची जबरदस्त एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस 17’ च्या पार्टीमध्ये अरबाज-शूराची जबरदस्त एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान 24 डिसेंबर रोजी शूरा खानसोबत विवाह बंधनात अडकला. अरबाजच्या या लग्नाने सगळेचजण आश्चर्यचकित झाले होते. लग्न झाल्यापासून अरबाज आणि त्याची पत्नी शूरा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. दरम्यान, नुकतीच या जोडीने ‘बिग बॉस 17’ च्या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हातात हात घालून अरबाज-शूराची एन्ट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज आणि शूराने एकमेकांचा हात धरून एन्ट्री केली. यावेळी या दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. यावेळी अरबाजने जीन्स आणि शर्टसोबत जॅकेट घातले होते. तर शूराने शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. अरबाज खान आणि शूरा खानच्या या स्टाइलचे चाहते कौतुक करत आहेत.

- Advertisement -

कोण आहे शूरा खान?

अरबाजची नवी गर्लफ्रेंड शूरा खान एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करते. अरबाज आणि शूराची पहिली भेट अरबाजच्या आगामी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

मलायकासोबत झालं होतं पहिलं लग्न

मलायका आणि अरबाज खानचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. 19 वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज अनेकदा मुलासोबत एकत्र दिसून येतात. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहेत.


हेही वाचा : रितेश देशमुखच्या स्टाईलने लावले वेड … महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन पुरस्कारावर कोरले नाव !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -