सैफिनाने दिली Good News! करीना दुसऱ्यांदा होणार आई

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी पुन्हा एकदा गुड न्यूज दिली असून त्यांच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्याचे आगमन होणार आहे. करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार आहे. याबाबतची माहिती स्वतः सैफने दिली असून त्याने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद. त्यामुळे तैमुरनंतर आता आणखी एका चिमुकल्या पाहुण्याची पतौडी फॅमिलीत एन्ट्री होणार आहे.

View this post on Instagram

❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

गेल्या डिसेंबर महिन्यात करीना कपूरचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा आई होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने, दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही. आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत, असे म्हटले होते.

हेही वाचा –

Sadak 2 Trailer : पहिल्या ६ तासांत १४ लाख viewers ने दर्शवली नापसंती