बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंहच्या गाण्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याने गायलेली प्रत्येक गाणी सुपरहिट ठरतात. भारतात तसेच परदेशातही अरिजीतचे अनेक लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात. अरिजीत सिंहने आत्तापर्यंत जवळपास बॉलिवूडमध्ये 221 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. अशातच, अरिजीत सिंहच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Spotify या ऑनलाइन म्युझिक अॅपवर अरिजित सिंह भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायक बनला असून फॉलोअर्सच्या बाबतीत, त्याने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना यांसारख्या अनेक गायकांना मागे टाकले आहे.
Spotify म्युझिक अॅपवर अरिजीत सिंह ठरला लोकप्रिय गायक
ऑनलाइन म्युझिक आणि पॉडकास्ट अॅप Spotify वर सर्वाधिक लोकप्रिय गायकांचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये अरिजीत सिंहचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अरिजीत सिंहने प्रसिद्ध इंग्लिश गायिका टेलर स्विफ्ट, रिहाना, बिली एलिस, एडेल, डेरेक, द वीकेंड आणि एमिनेम यांसारख्या अनेक लोकप्रिय गायकांना मागे टाकले आहे. या गायकांच्या लोकप्रियतेची ही यादी गायकांची गेल्या 8 महिन्यांतील गायलेली गाणी या आधारे निवडण्यात आली आहे.
अरिजीत सिंहचे लेटेस्ट साँग
मागील एक महिन्यामध्ये अरिजीत सिंहने अनेक उत्तम गाणी गायली आहेत. ज्यात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ गाणं प्रदर्शित झालं. त्याआधी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘झुमका’ आणि ‘तुम क्या मिले’ ही गाणी देखील अरिजीतने गायली आहेत.
अरिजीत सिंहचं वैयक्तिक आयुष्य
सध्या अरिजीतला बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि दर्दी आवाजाचा गायक म्हटलं जातं. 2013 मध्ये अरिजीतने गुरुकुल या रिअॅलिटी शोमधील सह-स्पर्धक रुपरेखाच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न केलं. मात्र, वर्षभरात त्यांच्या घटस्फोट झाला. त्यानंतर अरिजीतने 2014 मध्ये बालपणीची मैत्रिण कोयलशी लग्न केले.
हेही वाचा :