घरमनोरंजन'ना ये भौंकते हैं, ना गुर्राते हैं…बस काटते हैं!' 'कुत्ते'चा भन्नाट फर्स्ट...

‘ना ये भौंकते हैं, ना गुर्राते हैं…बस काटते हैं!’ ‘कुत्ते’चा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज

Subscribe

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सने टी-सीरिजसोबत त्यांच्या आगामी चित्रपट ‘कुत्ते’ चित्रपटाची घोषणा केली आणि चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आसमान भारद्वाज दिग्दर्शित पहिला आगामी चित्रपट असून अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू ‘कुत्ते’मध्ये दिसणार आहेत. आसमान भारद्वाज आणि विशाल भारद्वाज लिखित ‘कुत्ते’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. आकाश भारद्वाजने NYC च्या व्हिज्युअल आर्ट्स स्कूलमध्ये फिल्म मेकिंगमध्ये बॅचलर पूर्ण केले आहे आणि त्याचे वडील विशाल भारद्वाज यांना ‘7 खून माफ’, ‘माटरू की बिजली का मंडोला’ आणि ‘पटाखा’ अशा चित्रपटात असिस्ट देखील केले आहे.

‘कुत्ते’ माझ्यासाठी खूप खास असणार आहे कारण हा आसमानसोबत माझा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे मी उत्सुक आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील प्रथमच एकत्र काम करणार आहेत आणि मला या असोसिएशनबद्दल खूप आनंद आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नसीर साहब, तब्बू, कोंकणा आणि राधिका सोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आसमानने या सर्वांना एका चित्रपटात एकत्र आणले आहे, असे विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

- Advertisement -

हा चित्रपटाची प्रस्तुती गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरिजने केली असून चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे तर लिरिक्स गुलजार यांचे आहे. या चित्रपटाविषयी बोलताना भूषण कुमार म्हणाले, “आसमानचे दिग्दर्शन असणारा पहिला चित्रपट ‘कुत्ते’ साठी विशालजी आणि लव यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद झाला आहे. दोन अतिशय वैविध्यपूर्ण चित्रपट निर्मात्यांचा हा सर्जनशील समन्वय पाहणे रोमांचक असणार आहे. कुत्तेची कथा आणि स्टार कास्ट दोन्ही खूपच खास आहेत. लव फिल्मस आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांनी ‘कुत्ते’ ची निर्मिती केली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -