घरताज्या घडामोडीअर्जुन मलायका ब्रेकअपवर पडदा, मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

अर्जुन मलायका ब्रेकअपवर पडदा, मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

Subscribe

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडप्यांच्या जोडीपैकी एक जोडी आहे. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जिमपासून योगा सेशनपर्यंत किंवा लंच – डिनरपर्यंत पापाराझी त्यांना फॉलो करतात. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे तीन वर्षांपासून अफेअर चालू आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. मात्र असे असले तरी मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपचा विषय काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर सुरु होता.परंतु आता मात्र अर्जुन मलायका ब्रेकअपवर पडदा पडला असून, ते दोघेही मालदीवमध्ये रोमँटिक व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.सध्या हे लव्ह बर्डस मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करीत असून त्यांचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

- Advertisement -

दोघेही समुद्रकिनारा आणि तिथले चांगले जेवणाचा आनंद लुटत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये त्यांचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनीही एकत्र कोणताही फोटो शेअर केला नसला तरी दोघेही एकाच ठिकाणी असल्याचे फोटोंवरुन स्पष्ट झाले आहे. मलायकाने तिचा बिकिनीमधील सेल्फी शेअर केला आहे, तर अर्जुन कपूर फोटोमध्ये सोफ्यावर आराम करताना दिसत आहे.

- Advertisement -

अर्जुन कपूर नुकताच ‘भूत पोलीस’ या चित्रपटात दिसला होता.  यानंतर अर्जुन जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारियासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहेत.


हे ही वाचा – ST Worker strike: राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा कायदा लावण्याच्या तयारीत, अनिल परबांचा इशारा


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -