Malaika Arjun Wedding : मलायका अरोरा-अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात

arjun kapoor and malaika arora get married soon malaika arjun wedding date is close
Malaika Arjun Wedding : मलायका अरोरा - अर्जुन कपूर लवकरच अडकणार लग्नबंधनात

कतरिना कैफ, विकी कौशल आणि आलिया भट्ट रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर आता आणखी एका बॉलिवूड कपल लग्नासाठी सज्ज झालं आहे. होय, चाहत्यांची आवडती जोडी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मलायका आणि अर्जुन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे कपल आपल्या नात्याला नवं नाव देण्याच्या तयारीत आहेत. अर्जुन आणि मलायका 2022 च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान अर्जुन आणि मलायका ग्रँड वेडिंग करु इच्छित नाही. त्याऐवजी त्यांनी रजिस्टर मॅरेज करायचं आहे. मलायका आणि अर्जुन या हिवाळ्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत लग्न करण्याचा विचार करत आहेत, कारण या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. रणबीर-आलिया आणि कतरिना-विकी कौशलप्रमाणे त्यांचे लग्नही मुंबईत गुपचूप पद्धतीने होणार आहे. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

ग्रँड वेडिंग न करत साध्या पद्धतीने लग्न करत हे दोघं फिल्म इंडस्ट्रीतील लोकांसाठी पार्टीचे आयोजन करणार आहे. करीना कपूर खान देखील या जोडप्याच्या खूप जवळ आहे, त्यामुळे तिचे नाव देखील पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. मलायका आणि अर्जुन त्यांच्या लग्नाच्या ड्रेसवर जास्त खर्च करणार नाहीत. लग्नाच्या नोंदणीच्या दिवशी, मलायका साध्या पण आकर्षक साडीत, तर अर्जुन साध्या कुर्त्यात असू शकतो. दोघेही पार्टीसाठी वेस्टर्न आउटफिट निवडू शकतात.


‘Mann Udu Udu Zala’ फेम अजिंक्य राऊत इन्स्टाग्रामवरून गायब; नेमकं कारण काय?