घरमनोरंजनचित्रपटांवर होत असलेल्या बहिष्कारावर अर्जुन कपूरने व्यक्त केला संताप

चित्रपटांवर होत असलेल्या बहिष्कारावर अर्जुन कपूरने व्यक्त केला संताप

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' हे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही

सध्या बॉलिवूडमधील प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्श ऑफिसवर भरघोस कमाई करण्यात असफल ठरत आहेत. एकानंतर एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत परंतु प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यास पसंती दर्शवत नाहीत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता या चित्रपटांमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांबाबत चिंता सतावत आहे.

अर्जुन कपूरला आला राग
नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा तो म्हणाला की, मला वाटतं की, खूप दिवसांपासून शांत राहून आम्ही चूक केली आहे. आमच्या शांत बसण्याला आमचा कमकुवतपणा समजला जात आहे. आम्ही नेहमीच या गोष्टीवर विश्वास ठेवत आलो आहोत की, जे पण होईल शांत राहायचं, आपलं काम स्वताः उत्तरं देईल. तर यावेळी अर्जुन कपूरने सध्या बॉलिवूड चित्रपटांवर होत असलेल्या बहिष्काराच्या मागणीवर संताप देखील व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

- Advertisement -

अर्जुन कपूरच्या मते, बॉलिवूड चित्रपटसृष्टीला एकत्र येऊन या समस्येचं निवारण करायला हवं. तसंच तो चित्रपटांवर होत असलेल्या बहिष्कारावर म्हणाला की, बॉलिवूडच्या प्रत्येक पावलावर विरोध करण्यासाठी लोक उभेच आहेत. आम्ही या आशेवर आहोत की, चित्रपटगृह चालू होतील. चित्रपट चालतील आणि सगळं ठीक असेल. गेले दोन महिने बॉलिवूडसाठी खराब आहेत. बरेच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाही. मात्र यातील काही चित्रपट खरोखरंच चांगले नव्हते. त्यामुळे लोकांना चित्रपटांना ट्रोल करण्याची संधी मिळाली.


हेही वाचा :9 सप्टेंबरला काय होईल हे माहीत नाही…करण जोहरला वाटतेय ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची काळजी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -