आलियाच्या नव्या लूकवर अर्जुन कपूर इम्प्रेस; केलं भरभरून कौतुक

आलिया भट्टच्या लूकवर अर्जुन कपूर झाला इंप्रेस नुकताच आलियाने तिचा नवा लूक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये आलिया अधिकच आकर्षक दिसत आहे

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया डार्लिंग्सचं प्रमोशन करण्यासाठी केलेले वेगवेगळे लूक आलिया सोशल मीडियावर शेअर करत आहे. आलियाचे लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. शिवाय बॉलिवूड कलाकारही आलियाचं भरभरून कौतुक करत आहेत.

आलिया भट्टच्या लूकवर अर्जुन कपूर झाला इम्प्रेस

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

नुकताच आलियाने तिचा नवा लूक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये आलिया अधिकच आकर्षक दिसत आहे. आलिया या लूकवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

याफोटोंवर अर्जुन कपूरने देखील कमेंट केली आहे. यामध्ये अर्जुनने लिहिलंय की, प्रेग्नेंसीमध्ये अशी जॉलाइन…कमला आहे आलिया भट्ट, टू गुड. आलियाचा स्टाइलिश लूक प्रत्येकालाच इम्प्रेस करत आहे. आलिया आई होणार असल्याने अनेकांच तिच्या नवनवीन फोटोंकडे लक्ष लागून राहिलेले असते.

डार्लिंग्समध्ये दिसणार आलिया
आलियाचा डार्लिंग्स चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आलिया चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


हेही वाचा :न्यूड फोटोनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट; सिद्धार्थ जाधवने कमेंट करत म्हटले ‘भावा…’