Malaika Arora आणि Arjun Kapoorचा खरंच ब्रेकअप झालाय? पोस्ट लिहून केला खुलासा

सहा दिवसांहून अधिक वेळ मलायकाने आपल्या घरात स्वत:ला कोंडून घेतले होते. मलायका त्यांच्या नात्याविषयी फार चिंतेत होती.

arjun kapoor reaction on Breakup rumours of girlfriend Malaika Arora
Malaika Arora आणि Arjun Kapoorचा खरंच ब्रेकअप झालाय? पोस्ट लिहून केला खुलासा

बॉलिवूडची हॉट ओभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) आणि लविंग बॉय अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  यांचा ब्रेकअप झाला अशा बातम्या मागच्या दोन दिवसांपासून येत होत्या. दोघांच्या नात्याची अनेक दिवस चर्चा होती. आपल्या पेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मलायका सोबत अर्जुन डेट करत होता. दोघांचे रिलेशनशिप हे सर्वांसाठी फार चर्चेचा विषय झाला होता.दोघांचे रिलेशन फार काळ टिकू शकत नाही असे देखील अनेकांनी म्हटले होते. अर्जुन मलायका यांचा ब्रेक झाल्याचे सांगत मलायका सध्या फार कठीण काळातून जात असल्याचे सांगितले गेले. दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असताना अर्जुनने त्यांच्या ब्रेकअपवर पहिली प्रतिक्रीया देत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात अनेक समस्या होत्या. सहा दिवसांहून अधिक वेळ मलायकाने आपल्या घरात स्वत:ला कोंडून घेतले होते. मलायका त्यांच्या नात्याविषयी फार चिंतेत होती. असे म्हटले जात आहे की, दोघांच्या नात्यातील वादामुळे मलायकाने स्वत:ला सर्वांपासून काही दिवस दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या दिवसात अर्जुन देखील मलायकाला भेटण्यासाठी गेला नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनला तीन दिवसांपूर्वी त्याची बहिण रिया कपूरच्या घरी डिनर पार्टीला स्पॉट करण्यात आले. रिया कपूरच्या घरापासून मलायकाचे घर फार जवळ आहे. अर्जुन कधीही मलायकाच्या घराच्या आसपास असला तर तो आवर्जुन घरी जातो मात्र अर्जुन मलायका भेटायला न जाता थेट आपल्या घरी निघून गेला. मलायका अर्जुनच्या फॅमिली डिनर पार्टीमध्ये नेहमीच सहभागी होत असते मात्र या पार्टीला मलायकाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरुन दोघांचा ब्रेकअप झालाय असा अंदाज लावण्यात आला होता.

सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम देत अर्जुने पोस्ट लिहित आमचा ब्रेकअप झाला या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. ‘अशा अफवांना कोणतीही जागा नाही. सर्वांनी सुरक्षित रहा आणि खुश रहा असे’, म्हणत अर्जुने दोघांचा एक रोमँटीक मिरर सेल्फी शेअर केला आहे. अर्जुनच्या या पोस्टनंतर मलायकाने हार्ट इमोजी पोस्ट करत अर्जुनवरील प्रेम व्यक्त केले आहे. तर मलायकाची बहिण अमृता अरोराने देखील कमेंट करत ‘सत्यता सांगून टाक जून ( अर्जुन )’,अशी कमेंट केली आहे. त्यामुळे आता अर्जुनच्या या पोस्टनंतर त्याचा आणि मलायका ब्रेकअप या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा – arjun kapoor, malaika : अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप! अभिनेत्रीने स्वत:ला घेतले कोंडून