अर्जुन कपूरने विकलं मलायका अरोराच्या घराजवळचं घर; 4 कोटींचं झालं नुकसान

4,364 वर्ग फुट असलेला हा प्लॅट केसी मार्गावरील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आहे. २० कोटींचं हे घर अर्जुनने १६ कोटीला विकलं असून ४ कोटीचं त्याला नुकसान झालेलं आहे. दरम्यान, अर्जुनने अद्याप याबाबत काही खुलासा केलेला नाही.

बॉलिवूड अभिनेती अर्जुन कपूर वारंवार त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याचा ‘एक विलेन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त असून अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत आपलं नातं एन्जॉय करत आहे. यादरम्यान अर्जुनने त्याचं घर विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. वांद्रे परिसरातील ’81 औरेट बिल्डिंग’ मधील 16 कोटींना घर विवलेलं आहे.

4 कोटींचं झालं नुकसान
4,364 वर्ग फुट असलेला हा प्लॅट केसी मार्गावरील इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आहे.20 कोटींचं हे घर अर्जुनने 16 कोटीला विकलं असून 4 कोटीचं त्याला नुकसान झालेलं आहे. दरम्यान, अर्जुनने अद्याप याबाबत काही खुलासा केलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनच्या या घरातून समुद्राचे खूप सुंदर दृश्य दिसायचे. याशिवाय याघरामध्ये स्पा, लायब्ररी, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा होत्या. सध्या अर्जुन त्याच्या जुहू येथील घरामध्ये राहत आहे. तर त्याची प्रेमिका मलायका अरोरा वांद्र्यातील ’81 औरेट बिल्डिंग’ येथेच राहते. मलायका व्यतिरिक्त याचं बिल्डिंगमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, करण कुंद्रा आणि क्रिकेटर पृथ्वी शॉ सुद्धा राहतात.

अर्जुन कपूरची कमाई
मीडिया रिपोर्ट्सच्या मते, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती जवळपास 74 कोटी इतकी आहे. एका चित्रपटामागे अर्जुन 5 ते 7 कोटी रूपये घेतो.

या चित्रपटात झळकणार अर्जुन
दरम्यान, अर्जुन कपूर येत्या काळात ‘एक विलेन रिटर्न्स’मध्ये दिसून येणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ हे चित्रपट सुद्धा आहेत. याआधी अर्जुन कपूरचे बरेच चित्रपट रिलीज झाले आहेत. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकले नाहीत.


हेही वाचा :रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ