अर्जुन कपूरची पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल म्हणाला,मदर्स डे चा प्रचंड तिरस्कार आहे…

नेटफ्लिसच्या आगामी चित्रपट 'सरदार का ग्रैंड सन' मध्ये दिसणार आहे. तसेच मलायिका अरोरा सोबतच्या अफेयरच्या चर्चांमुळे अर्जुन वर सगळ्यांची नजर आहे.

Arjun Kapoor's post goes viral on social media, saying, 'Mother's Day' is very hateful ...
अर्जुन कपूरची पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल म्हणाला,'मदर्स डे' चा प्रचंड तिरस्कार आहे...

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपट कारकीर्दीत अद्याप काही आपली खास चमक दाखवू शकला नसला तरीही त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे  माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर त्याच्या अनेक चर्चा रंगत असतात. अर्जुन सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. अर्जुनचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होते. तो नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम वर आईचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकतच पार पडलेल्या जागतिक मातृदीनाच्या आदल्या दिवशी अर्जुन कपूरने त्याच्या आई सोबतचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला. आणि त्यावर अत्यंत भावनिक कॅप्शन लिहलं होतं. “काल मदर्स डे होता मला त्या गोष्टीचा,दिवसाचा अगदीच तिरस्कार आहे …. उद्या मला अभिनेता म्हणून 9 वर्षे झाली. पण आजही मी तुझ्याशिवाय हरवलेला आहे. या फोटो मध्ये तू मला जसे पाहत आहे आशा आहे की तू आत्ताही माझ्याकडे पाहत आहेस आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत आहेस.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आई मोना कपूर यांचे निधन झाले होते. अर्जुन कापुरने 2012 मध्ये ‘इशकजादे’ या चित्रपटामधून बॉलिवुड मध्ये डेब्यू केलं होतं.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास अर्जुन लवकरच रकुल प्रीत सोबत नेटफ्लिसच्या आगामी चित्रपट ‘सरदार का ग्रैंड सन’ मध्ये दिसणार आहे. तसेच मलायिका अरोरा सोबतच्या अफेयरच्या चर्चांमुळे अर्जुन वर सगळ्यांची नजर आहे.


हे हि वाचा – ट्विटरवर #ArrestMunmunDutta ट्रेंडिंगवर, नेटकर्‍यान कडून होतेय बबीताजी च्या अटकेची मागणी !