घरमनोरंजनराणीच्या घराबाहेर अरमान कोहलीने केली लघुशंका

राणीच्या घराबाहेर अरमान कोहलीने केली लघुशंका

Subscribe

अरमान कोहलीने दारूच्या नशेत राणी मुखर्जीच्या बंगल्याबाहेर लघुशंका केली. जाणून घ्या काय होते कारण.

राग हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. म्हणून रागाच्या आणि दारूच्या नशेत माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असफल अभिनेता अरमान कोहलीच्या बाबतीत हे नक्कीच खरे ठरले आहे. अरमान कोहली आत्ता राणी मुखर्जी हिच्या जुहू येथील बंगल्याच्या भिंतीवर लघुशंका करत असल्याचे समोर आले आहे. राणीची चुलत बहीण तनिषा मुखर्जी हिचा एक्स बॉयफ्रेंड अरमान कोहली हा तनिषावरील राग व्यक्त करण्यासाठी तिच्या बंगल्याबाहेर लघुशंका करतो. ही माहिती अरमानचे वडील सुप्रसिध्द अभिनेता राजकुमार कोहली यांच्या ड्राइव्हरने स्पॉटबॉय या संकेतस्थळाला दिली.

अरमान पुन्हा चुकीच्या कारणांसाठी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. नुकतेच जून २०१८ मध्ये त्याने त्याच्या एक्स लिव्ह – इन गर्लफ्रेंड नीरू रंधावाला मारण्यासाठी चर्चेत होते. एवढे की तिला कोकीलाबेन अंबानी रूग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. नीरूने अरमान विरूध्द पोलिस ठाण्यात तक्रार सुध्दा नोंदवली होती.

- Advertisement -

या चर्चा संपतच नाहीत तोच आत्ता त्याने राणी मुखर्जीच्या घराबाहेर लघुशंका केल्याची बातमी आली.

तनिषा व अरमान हे दोघे बिग बॉसमध्ये एकत्र होते. तिथे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र अरमानने बऱ्याचदा तनिषाला मारहाण देखील केली होती. त्याच्या तापट आणि रागीट स्वभावामुळे त्यांचे २०१४ मध्ये ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपझाल्यावर तेव्हा ते स्पष्ट होते की अरमान तनिषाचा आदर करत नाही. त्यांच्यात ट्विटरच्या माध्यमातूनही वाद सुरू होता. त्यात काजोलची बहीण तनिषा असे ही म्हणाली होती की “आयुष्यात जेव्हा प्रेम आणि आदर या गोष्टींमधून एक निवडायची वेळ येते, तेव्हा आदराची निवड करावी. आदराविना प्रेम तात्पुरते असते पण आदर असला तर ते प्रेम कायमस्वरूपी टिकू शकते.”

- Advertisement -

ब्रेकअपनंतर समोरासमोर आल्यावर तनिषाने अरमानच्या कानाखाली देखील वाजवली होती. या कारणामुळे अरमानला तिच्यावर प्रचंड राग आला होता. ‘तनिषाने अरमानसोबत केलेल्या ब्रेकअपचा राग आजही अरमानच्या मनात आहे. कधी कधी तो दारूच्या नशेत असताना त्याचा हा राग अनावर होतो. ब्रेकअपनंतर अनेकदा अरमान दारूच्या नशेत तनिषाला शिव्या घालायचा. त्याला तिचा इतका राग यायचा की तो त्याचा राग काढण्यासाठी तनिषाची बहीण राणी मुखर्जीच्या बंगल्याबाहेर लघुशंका करायचा’, असेही सोनूने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -