घरमनोरंजन'ओन्ली जस्ट बिगन' या ॲपल रेडिओ शोमधून अरमान मलिक करणारा पदार्पण

‘ओन्ली जस्ट बिगन’ या ॲपल रेडिओ शोमधून अरमान मलिक करणारा पदार्पण

Subscribe

आपल्या विलक्षण संगीत प्रतिभेसाठी ओळखला जाणारा, गायक-गीतकार अरमान मलिक आपला प्रभाव नव्या क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. अशातच, जगभरातील ऍपल म्युझिकवर ‘ओन्ली जस्ट बिगन’ वर रेडिओ शो डेब्यू करणारा पहिला भारतीय संगीतकार म्हणून अरमान मलिकने आपले नाव कोरले आहे. 5 एप्रिल, 2024 रोजी पदार्पण करण्यासाठी सेट असलेला, हा कार्यक्रम म्युझिक इंडस्ट्रीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित अतिथींच्या उत्कृष्ट श्रेणीचे वचन देतो. सहा आठवड्यांच्या जागतिक रोलआउटमध्ये, ऍपल म्युझिकवरील श्रोते प्रत्येक भागाचा आस्वाद घेऊ शकतात, जिथे अरमान गेस्ट्ससोबत त्याच्या संगीतमय प्रवासाची, दृष्टी आणि उत्कटतेबद्दल चर्चा करतो.

त्याच्या भव्य रेडिओ पदार्पणाबद्दल अरमान मलिक म्हणतो, “ओन्ली जस्ट बिगन रेडिओ’, माझा रेडिओ शो सादर करताना मला खूप आनंद होत आहे. भारतातील आणि बाहेरील प्रतिभावान संगीतकारांशी अर्थपूर्ण संभाषणे क्युरेट करणे आणि शेअर करणे हा एक अविश्वसनीय प्रवास आहे. ‘ओन्ली जस्ट बिगन रेडिओ’ या पाहुण्यांना त्यांच्या कथा स्पष्टपणे सांगण्यासाठी आणि त्यांचा प्रवास माझ्याशी सखोल मार्गांनी कसा गुंफला गेला आहे, यासाठी सुरक्षित जागा म्हणून काम करते. केवळ रेडिओ शो पेक्षा, आम्ही प्रत्येकाच्या आवडत्या कलाकारांमागील आकर्षक कथा आणि त्यांच्या गाण्यांचे अनावरण करण्याची आकांक्षा बाळगतो, ज्यामुळे श्रोत्यांना एक अस्सल आणि इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव मिळतो.

- Advertisement -

अरमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अरमान मलिक त्याच्या संगीत कारकीर्दीत व्यस्त आहे. अलीकडेच, त्याने ‘दो और दो प्यार’साठी ‘जज्बाती है दिल’ आणि ‘पटना शुक्ला’साठी ‘जीतेगा तेरा जुनून’ या नवीनतम गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच, तो एड शीरन, मार्शमेलो आणि लौव सारख्या आंतरराष्ट्रीय संगीत कलाकारांसोबत स्टेज शेअर करत आहे आणि जागतिक स्तरावर आपली प्रतिभा दाखवत आहे.


हेही वाचा : 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -