घरमनोरंजनट्विटरवर #ArrestMunmunDutta ट्रेंडिंगवर, नेटकर्‍यान कडून होतेय बबीताजी च्या अटकेची मागणी !

ट्विटरवर #ArrestMunmunDutta ट्रेंडिंगवर, नेटकर्‍यान कडून होतेय बबीताजी च्या अटकेची मागणी !

Subscribe

देशभरातून मुनमुन दत्ता हिला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ट्विटरवर सुद्धा #ArrestMunmunDutta हा टॅग सध्या प्रचंड ट्रेंडिंग झाला आहे.

प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता समोर आता भले मोठे संकट उभे राहिले आहे. देशभरातून मुनमुन दत्ता हिला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ट्विटरवर सुद्धा #ArrestMunmunDutta हा टॅग सध्या प्रचंड ट्रेंडिंग झाला आहे.
का होतेय मुनमुन दत्ताला अटक करण्याची मागणी ?
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर नुकतच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्ट मध्ये मुनमुन दत्ताने विशिष्ट जाती वर काही अपमानजनक शब्दांचा उल्लेख केला होता. मुनमुनच्या विवादीत वक्तव्यानंतर लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मुनमुन वर जातीयवादाचा आरोप लावण्यात येत आहे. लोकांचा वाढता राग पाहता मुनमुन दत्ताने घडलेल्या घटनेची सविस्तरपणे माफी मागितली आहे तसेच. स्पष्टीकरण देखील केले आहे. मुनमुन दत्ताने ट्विटर वर लिहलं आहे की,”मी सगळ्या लोकांचा सन्मान करते. तसेच मी व्हिडिओचा वादग्रस्त भागही काढून टाकला आहे. काल मी पोस्ट केलेल्या व्हिडिओ दरम्यान मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.त्या व्हिडिओ मागचा उद्धेश हा कोणाचीही भावना दुखावणे, धमकावणे, अपमानित करणे किंवा दुखापत करण्याचा नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाच्या अर्थाबद्दल चुकीचे माहिती देण्यात आली होती. मला त्याचा अर्थ कळाला आहे. मी व्हडिओ मधून ताबडतोब तो वादग्रस्त भाग काढून टाकला आहे. मला समाजातील प्रत्येक जाती, धर्म, लिंग, प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर आहे आणि त्यांचे समाज किंवा राष्ट्रातील अपार योगदान मी स्वीकारते.

मुनमुन दत्ताने विवादीत व्हिडिओ हटवल्या नंतर देखील व्हिडिओ मधील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

हे हि वाचा – ‘राधे’चित्रपटातील ‘झूम-झूम’ गाण्यात दिशा पटानी आणि सलमान खानचा जबरदस्त केमिस्ट्री धमाका !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -