घरमनोरंजन...आणि कपिलने अर्शदला शोच्या बाहेरचा रस्ता दाखवला!

…आणि कपिलने अर्शदला शोच्या बाहेरचा रस्ता दाखवला!

Subscribe

कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या त्याच्या सोनी टीव्हीवरील दि कपिल शर्मा शोमध्ये चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. यापूर्वीही कपिलने त्याचा शो यशस्वी करून चाहत्यांची मने जिंकली होती. मात्र काही काळाने त्याच्या वर्तणुकीमुळे कपिलला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्याचा शो लोकप्रिया मिळत आहे. मात्र कपिल शर्मा याचे नुकत्याच एका एपिसोडमध्ये अभिनेता अर्शद वारसी याला शोच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे ऐकून कपिल आणि अर्शद या दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला असले. परंतू हे खरं आहे. तसा व्हिडिओ कपिलने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले 

पागलपंती या कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अर्शद वारसी, अनिल कपूर आणि जॉनी अब्राहम हे कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी आले होते. सोबत चित्रपटातील नायिका उर्वशी रोतेलादेखील होती. कपिलने नेहमीच्या अंदाजात उर्वशीसोबत फ्लर्ट करण्यास सुरुवात केली. उर्वशीनेही त्याला तुझे सर्वच अंदाज छान असतात, अशी सकारात्मक दाद दिली. त्यानंतर दोघांचेच संभाषण सुरु असल्याचे पाहून अर्शदने, चला आपण शोमधून जाऊया असा इशारा इतर कलाकारांना केला. विशेष म्हणजे कपिलनेदेखील मजेमजेत अर्शदभाई इथून नाही, तर तिथून बाहेर जा, असे सांगितले. यासोबत कार्यक्रमात एकच हशा पिकला. या कारणासाठी कपिलने अर्शदला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

हेही वाचा 

मर्दानी-२ चा ट्रेलर लाँच; अंगावर काटा आणणारी दृश्यं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -