घरमनोरंजनअर्शी खानाने लग्नाला नवरा शोधण्यासाठी मागतेय सलमानची मदत

अर्शी खानाने लग्नाला नवरा शोधण्यासाठी मागतेय सलमानची मदत

Subscribe

‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री अर्शी खान सध्या लग्न करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे. आर्शीला आता लग्न करत स्वत:चा संसार थाटायचा आहे. लवकरचं तिचा एक नवा स्वयंवर शो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ज्यात ती स्वत:साठी नवरा शोधणार आहे. पण या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी अर्शी खानने भाईजान सलमानची मदत मागितली आहे. अर्शी खानने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आगामी शोबद्ल माहिती देत तिनं यासाठी सलमान खानची मदत मागितली आहे.

अर्शी खानने तिच्या नव्या स्वयंवर शोची माहिती प्रेक्षकांनी दिला आहे. या शोमध्ये अर्शीने कोणाला नवरा म्हणून निवडायचे किंवा कोणाला नाही याचा निर्णय तिलाच घ्यायचा आहे. या शोबद्दल बोलताना आर्शी खान म्हणाली, मला वाटतं सलमान सरांनी नवरा शोधण्यासाठी मदत करायला हवी.  कारण सलमान सर एकटेच आहेत ज्यांनी मला माझ्या करियरमध्ये पुढे जाण्यास आणि यशस्वी होण्यास मदत केली आहे. बिग बॉसच्या घराने मला आयुष्यभरासाठी शिकवण दिली आहे.

- Advertisement -

स्वयंवर शोमध्ये अर्शी ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. तसेच अनेक प्रोजेक्टवर काम करणार आहे. अर्शी खान सध्या स्वयंवर शोमध्ये बिझी असल्यानं कोणत्याही ऑफर स्वीकारता येत नसल्याचं ती सांगते. पण यासोबतच या शोचं शूटिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत कमबॅक करणार असल्याचंही ती सांगते.

अभिनय आणि मॉडेलिंग करण्याआधी अर्शी खान एक फिजियोथेरपिस्ट म्हणून काम करत होती. यापूर्वी ती एका तमिळ चित्रपटातही झळकली होती. याशिवाय तिनं ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ आणि ‘विश’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -