Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Ganeshostav 2021:गणेश चतुर्थीचा फोटो पोस्ट करताच अर्शी खान झाली ट्रोल

Ganeshostav 2021:गणेश चतुर्थीचा फोटो पोस्ट करताच अर्शी खान झाली ट्रोल

अर्शीच्या  फोटोवर अनेकांनी वाईट कमेंट करत तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केला असून ट्रोल करण्यास सुरुवात केली . लोकांचा इतका संताप आणि रोष पाहून अर्शीन यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करत नेटकऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

Related Story

- Advertisement -

 

बिग बॉस(bigg boss) फेम अर्शी खान(Arshi Khan) तिच्या अतरंगी पणामुळे तसेच वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत लाईम-लाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेकदा अर्शीला तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ट्रोलींगचा सामना करावा लागला आहे. मात्र अर्शीसुद्धा ट्रोलर्सला चांगलेच सुनावताना दिसते. दरम्यान पुन्हा एकदा अर्शीला नेटकऱ्यांचा टीकेला समाना करावा लागत आहे. नुकतच अर्शी गणेश चतुर्थीला  मित्र-मैत्रिणींच्या घरी गेली होती. यावेळी अर्शीने इंडियन लूक परिधान केला होता आणि सोशल मीडियावर एक सुंदर फोटो  पोस्ट करत इंस्टावर स्टोरी शेअर केली होती. मात्र अर्शीच्या  फोटोवर अनेकांनी वाईट कमेंट करत तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केला असून ट्रोल करण्यास सुरुवात केली . लोकांचा इतका संताप आणि रोष पाहून अर्शीन यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करत नेटकऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.(arshi khan replay to trollers)

- Advertisement -

अर्शी म्हणाली ,मी या सुंदर आसामी लूकमध्ये गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी माझ्या मित्रांच्या घरी गेले होते. मला वाटले की मी एक छान फोटो पोस्ट करेन, जे तुम्हाला देखील पसंत पडेल. जेव्हा मी घरी आले आणि पाहिले की तुम्ही माझ्या फोटोवर खूप शिव्या देत आहात. मी केलेल्या एका पोस्टवर मुस्लिम लोकांनी मला खूप शिव्या दिल्या आहेत. धर्म म्हणजे काय? माझ्या कमेंट बॉक्समध्ये जो कोणी हिंदू, मुस्लिम असा भेद करत आहे त्यांनी निघून जा. एक भारतीय म्हणून मला जो सण साजरा करायचा आहे तो मी करेन. ईद असो किंवा दिवाळी. यामुळे मला खूप आनंद होतो. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

- Advertisement -

अर्शी पुढे म्हणाली, कृपा करुन तुम्ही मला शिकवू नका मला काय करायला हवे, हा मी मुसलमान आहे. मला माहितीये की मी एक मुसलमान आहे.पण मी एक भारतीय सुद्धा आहे.आणि सर्व सण उत्सव साजरे करणार. तुम्हां सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. मी आशाच प्रकारे तुम्हां सर्वाना शुभेच्छा देत राहणार. अर्शी खानने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.


हे हि वाचा – सपना चौधरीचे कार अपघातात निधन झाल्याची बातमी व्हायरल !

- Advertisement -