Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनArunoday Singh Divorced : कुत्र्यामुळे मोडला प्रसिद्ध अभिनेत्याचा 3 वर्षांचा संसार, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Arunoday Singh Divorced : कुत्र्यामुळे मोडला प्रसिद्ध अभिनेत्याचा 3 वर्षांचा संसार, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Subscribe

बॉलीवूड सिनेविश्वात लव्ह, अफेअर, रिलेशनशिप, ब्रेकअप, पॅचअप यांसोबत आता लग्न आणि घटस्फोटदेखील सामान्य झाले आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे शाही विवाहसोहळे झाले आणि त्यांपैकी कित्येकांचे डिव्होर्ससुद्धा झाले. त्यामुळे आता डिव्होर्स हा प्रकार बॉलिवूडकरांसाठी नवीन राहिलेला नाही. यासाठी आपसी मतभेद, घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंध अशी कारण समोर आली आहेत. पण एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा घटस्फोट चक्क पाळीव कुत्र्यांमुळे झालाय. ऐकायला विचित्र वाटेल पण हेच खरं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Arunoday Singh Divorced Reason Will Surprised You)

आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय त्याच नाव आहे अरुणोदय सिंग. 13 डिसेंबर 2016 रोजी अरुणोदयने कॅनडाच्या ली एल्टनसोबत प्रेम विवाह केला होता. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण लग्नानंतर एका छोट्या कारणामुळे त्यांचं हे प्रेमाचं नातं अगदी 3 वर्षांतच मोडीत निघालं. एका भव्य सोहळ्यात अरुणोदय आणि ली एल्टनने सात जन्मासाठी फेरे घेतले होते. पण अवघ्या तीन वर्षांत त्यांचा संसार मोडला. 2019 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या घटस्फोटाच कारण ठरलं प्राणीप्रेम.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arunoday Singh (@sufisoul)

अभिनेता अरुणोदयला कुत्रे पाळण्याची फार आवड आहे. त्याचं सोशल मीडिया हॅण्डल पाहिलात तर समजेल त्याच्या प्रोफाइलवर कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो आहेत. त्याचं हे प्राणीप्रेम त्याच्या प्रेमविवाहावर इतकं भारी पडेल याचा त्याने कदाचित विचारदेखील केला नव्हता असेल. अरुणोदय आणि ली एल्टनच्या लग्नानंतर तिला घरातील कुत्र्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागला. ज्यामुळे रोज दोघांमध्ये भांडणं व्हायची. अरुणोदयने पाळलेले कुत्रे सतत भुंकायचे आणि त्यामुळे ली एल्टन वैतागायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arunoday Singh (@sufisoul)

या एकमेव कारणावरून पती-पत्नीमध्ये दररोज खटके उडायचे. दिवसागणिक त्यांच्यातील तणाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी वेगळ व्हायच ठरवलं. त्यांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि लग्नानंतर तीन वर्षांतंच ते वेगळे झाले. अभिनेत्याचा घटस्फोट होऊन जवळपास 6 वर्षे झाली. असे असले तरीही अद्याप त्याने दुसरं लग्न केलेलं नाही. 42 वर्षीय अरुणोदय सिंगल लाईफ जगतोय आणि अनेकदा तो आपल्या आयुष्याबद्दल बोलणं टाळताना दिसतो.

अरुणोदय सिंगची कारकीर्द

अभिनेता अरुणोदय सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2009 मध्ये ‘सिकंदर’ सिनेमातून फिल्म डेब्यू केला होता. यानंतर ‘जिस्म 2’, ‘मैं तेरा हीरो’, ‘मिस्टर एक्स’, ‘ब्लॅकमेल’ आणि ‘मोहेंजोदडो’सारख्या सिनेमात त्याने विविध भूमिका साकारल्या. अद्याप त्याला बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक मिळालेला नाही. पण ओटीटीवर ‘अपहरण’ या वेब सीरिजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. आगामी काळात तो ‘श्रीमान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही पहा –

Aruna Irani Love Life : या कारणामुळे अरुणा इराणींनी लपवलं लग्न अन् घेतला आई न होण्याचा निर्णय