घर मनोरंजन जेव्हा रामायणातील रावणाने हेमा मालिनींना २० वेळा कानशिलात लगावली होती...

जेव्हा रामायणातील रावणाने हेमा मालिनींना २० वेळा कानशिलात लगावली होती…

Subscribe

सिनेमांच्या शुटिंग दरम्यान कलाकारांमध्ये असे काही ना काहीतरी होतो की, ते पुढे जाऊन एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहत नाहीत. असाच एक किस्सा दोन कलाकारांसोबत घडलाय. खरंतर बॉलिवूड मधील ड्रीमगर्ल म्हणजेच हेमा मालिनी आणि रामानंद सागर यांच्या रामायणातील अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्यामधील हा किस्सा आहे. हा किस्सा खरंतर असा आहे की, एकदा हेमा मालिनी यांना अरविंद यांनी एक-दोन नव्हे तर चक्क २० वेळा कानशिलात लगावली होती. पण असे त्यांनी का केले? हेच आपण पाहूयात.

खरंतर हे संपूर्ण प्रकरण १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम तेरे आशिक हैं’ मधील असल्याचे सांगितले जाते. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, एका सीन मध्ये अरविंद यांना हेमा मालिनी यांना कानशिलात मारायची होती. पण हेमा मालिनी या तेव्हा एक मोठ्या अभिनेत्री होत्या. अशातच अरविंद हे त्यांना कानशिलात मारण्यासाठी फार घाबरत होते. यामुळेच त्यांना २० वेळा हेमा मालिनी यांना त्या सीनसाठी कानशिलात लावावी लागली होती.

- Advertisement -

तर अरविंग त्रिवेदी यांनी खरंतर काही सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. पण त्यांना खरी ओळख ही रामानंद सागर यांच्या द्वारे बनवण्यात आलेल्या टीवी सीरियल रामायणातून मिळाली होती. अरविंद यांनी या टीवी सीरियलमध्ये रावणाची भुमिका साकारली होती. अरविंद यांचा अभिनय ऐवढा जबरदस्त होता की, ही सीरियल प्रदर्शित झाल्यानंतर लोक त्यांना रावणाच्या नावाने ओळखू लागले होते.


हेही वाचा- लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा ‘अनलॉक जिंदगी’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -