घरताज्या घडामोडीAarya Season 2 : सुष्मिता सेनच्या खतरनाक लूकसह वेब सीरीज 'आर्य 2'...

Aarya Season 2 : सुष्मिता सेनच्या खतरनाक लूकसह वेब सीरीज ‘आर्य 2’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

सुष्मिता सेनच्या ‘आर्या 2’ या वेबसिरीजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सुष्मिताचा फर्स्ट लूक हा अतिशय खतरनाक दाखवण्यात आला असून तिची भूमिका आक्रमक दिसत आहे. टीझर शेअर करताना  आर्याचे वर्णन सिंहिणी असे केले आहे. ही वेब सीरीज लवकरच डिज़्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिज़्नी+ हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे. या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरसाठी खूप उत्सुक होते. याचा टीझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करते ज्यात आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

- Advertisement -

राम माधवानी फिल्म्सकडून पुरस्कार विजेत्या आणि अत्यंत प्रतिभावान राम माधवानी निर्मित हा टीझर प्रेक्षकांना एक रोमांचक आणि रक्तरंजित शो सादर करणार आहे. ज्यामध्ये आर्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधिक कठोर आणि गडद होणार आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक भयंकर आणि क्रूर लूकमध्ये दिसत आहे, ती उग्र लाल रंगात माखलेली असून, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसत आहे.

‘‘पहिल्या सीजनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखावणारे होते, यासाठी आम्ही प्रेमपूर्वक आणि संपूर्ण मेहनतीने याचा दूसरा सीजन बनवण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एमी अवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन या कथेवरचा आमचा विश्वास प्रदर्शित करतो, जी ऐकवण्यासाठी आम्ही इथे आहोत. शोच्या चाहत्यांना आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी संतुलन बनवण्यासाठी मजबूर आहे.’’ असे दूसऱ्या सीजनविषयी, दिग्दर्शक राम माधवानी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – Amjad Khan B’day Special : शोलेत गब्बरच्या रोलसाठी अमजद खान नव्हता फर्स्ट चॉईस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -