घरताज्या घडामोडीआर्यन खानसाठी जुही चावलाचे देवाला साकडे

आर्यन खानसाठी जुही चावलाचे देवाला साकडे

Subscribe

जुही आर्यनच्या नावाने तब्बल ५०० झाडे लावणार

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आज वाढदिवस. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्याला दर शुक्रवारी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. आज शुक्रवारी आर्यन खानला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. पहिल्यांदाच आर्यन खानच्या वाढदिवसाला खान परिवारात कोणतेही सेलिब्रेशनचे आयोजन केलेले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आर्यन खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

- Advertisement -

आर्यन खान प्रकरणात शाहरुखच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलेली शाहरुखची मैत्रिण आणि अभिनेत्री जुही चावलाने मात्र आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यनसाठी देवाकडे साकडे घातले आहे. आर्यन खान घरी आल्यापासून तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन आधीच फार शांत होता मात्र या प्रकरणानंतर तो आणखीच शांत झाला आहे. आर्यन पुन्हा पूर्वीसारखा व्हावा म्हणून जुहीने प्रार्थना केली आहेत जुहीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आर्यनचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यात छोटे आर्यन खान आणि सुहाना खान दिसत आहेत. हा फोटो डिन्जी लँडमधील असल्याचे म्हटले जात आहे.

लाडक्या आर्यनला शुभेच्छा देत जुहीने त्याला खास गिफ्ट देखील दिले आहे. जुही आर्यनच्या नावाने तब्बल ५०० झाडे लावणार असल्याचे तिने म्हटले आहे. आर्यनसह जय,जुही,जान्हवी,आर्जुन यांच्या नावाने देखील जुही झाडे लावणार आहे. आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी जूही चावलाने शाहरुख खानची महत्त्वाची मदत केली होती. जूही शेवटच्या क्षणापर्यंत आर्यनच्या जामिनासाठी कोर्टात थांबली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Kkhan : आर्यन खानचे कवच बनणार रवी सिंह, शाहरुख स्वत:साठी नव्या बॉडीगार्डच्या शोधात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -