Aryan Khan Drug Case: आर्यन खानची केस पाहून बॉलिवूड स्टारकिड्सचा भारत सोडण्याचा निर्णय!

Bombay High Court To Hear Aryan Khan Bail Plea In Cruise Ship Drug Case On Tuesday
Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचा कारागृहातील मुक्काम वाढला; मंगळवारी जामीन अर्जावर होणार सुनावणी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यापासून शाहरुख खान आणि गौरी खानला व्यवस्थितीत झोपही लागली नाही आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयाने काही माध्यमांना सांगितले होते. आर्यन खानवर ड्रग्जची देवाण-घेवाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीत शाहरुख खानसोबत बॉलिवूड अनेक कलाकार उभे आहेत. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. नुकताच बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान पुन्हा एकदा शाहरुख खानला भेटण्यासाठी मुंबईतील मन्नत बंगल्यावर गेले होता. यादरम्यान अभिनेता केआरके (KRK) म्हणजेच कमाल आर खान (Kamaal R Khan) एक अजब दावा केला आहे. आर्यन खानची केस पाहून बॉलिवूड स्टारकिड्स भारत सोडून जाण्याचा निर्णय घेत असल्याचा दावा केआरकेने केला आहे.

अभिनेता केआरके आपल्या अजब दाव्यामुळे चर्चेत असतो. कमाल खान नेहमी इंडस्ट्री आणि त्यासंबंधित कलाकारांवर प्रतिक्रिया देत असतो. आता देखील त्याने आर्यन खान संबंधित अजब दावा करून चर्चेत आला आहे. कमाल खानने असा दावा केला आहे की, ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला अटक झाल्यानंतर बॉलिवूडचे अनेक स्टारकिड्स भारत सोडण्याचा प्लॅनिंग करत आहे. त्याने ट्वीट करून हा दावा केला आहे. त्यामुळे त्याच्या या ट्वीटबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे.

केआरकेने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या सूत्रांनुसार आर्यन खानच्या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटी किड्स भारत सोडण्याचा वियार करत आहेत. जर आर्यन खानच्या बाबतीत असे घडू शकते, तर ते कोणासोबतही होऊ शकते, असे त्यांना वाटत आहे.’


हेही वाचा – Cruise Drug Case: मला पार्टीत ग्लॅमर येण्यासाठी बोलावण्यात आले – मुनमून धमेचा