Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आर्यन खानच्या Stardom च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने मुलाला दिले असे सरप्राइज

आर्यन खानच्या Stardom च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने मुलाला दिले असे सरप्राइज

Subscribe

बॉलिवूड मधील बादशाह शाहरु खान याने आपल्या अभिनयाच्या करियरमध्ये फार मोठी झेप घेतली आहे. त्याच्या आयुष्याचा प्रवास प्रत्येकानेच पाहिला आहे आणि प्रत्येकालाच माहितेय. सुहाना खान हिला सुद्धा आपल्या वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून अभिनयात करियर करायचेय. पण आर्यनला अभिनयात फार कमी आवड असल्याचे वेळोवेळी दिसून येते. (Stardom web series)

आर्यन खानला दिग्दर्शक आणि लेखक बनून आपल्या करियरची गाडी पुढे घेऊन जायची आहे. तर गेल्या काही काळापासून अशा खुप चर्चा होती की , तो ‘ ‘स्टारडम’ नावाच्या सीरिजवर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शुटिंग ही सुरु झाले आहे.

- Advertisement -

स्टारडम काही प्रकारे फार महत्वाची ठरु शकते. याच्या माध्यमातून त्याला आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. अशातच शाहरुख खान त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेटवर गेला होता. असे सांगितले जातेय की, तो सकाळी सात वाजताच सेटवर येत मुलाला सरप्राइज दिले. तसेच त्याने तेथील टीमची ही भेट घेतली. (Stardom web series)

- Advertisement -

स्टारडमची कथा काय असणार?
जसे नावावरुन कळते की, आर्यन खानची ही वेब सीरिज कलाकार आणि त्यांचा स्टारडम दाखवणार आहे. सहा एपिसोड असलेली ही एक सीरिज असणार आहे. याच्या प्रोडक्शनची कमान शाहरुखचे प्रोडक्शन हाउस रेड चिलीज एंटरटेनमेंटने सांभाळली आहे. दरम्यान दीर्घ काळापासून आर्यन अभिनयातून डेब्यू करणार असल्याची चर्चा होती. परंतु त्याने दिग्दर्शक बनून आपल्या करियरची गाडी पुढे नेणे पसंद केले आहे. यापूर्वी आर्यनने D’YAVOL जाहिरातीत किंग खान सोबत झळकला होता. ती जाहिरात सुद्धा त्यानेच दिग्दर्शित केली होती.


हेही वाचा- रणवीर सिंह झळकणार हॉलिवूडमध्ये; विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत केला करार

- Advertisment -