घरमनोरंजनमराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते...पोस्ट शेअर करत सचिनने केलं...

मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते…पोस्ट शेअर करत सचिनने केलं प्रशांत दामलेंचे कौतुक

Subscribe

मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले त्यांच्या उत्तम नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. गेल्या 35 वर्षापासून अभिनेते प्रशांत दामले मनोरंजनसृष्टीशी जोडलेले आहेत. 1983 पासून त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी अनेत नाटकं गजवली. दरम्यान, नुकताच त्यांनी एक नवीन विक्रम केला आहे.

रविवार, 6 नोव्हेंबर म्हणजेच आज श्री षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामले यांच्या आयुष्यातील 12,500 वा नाट्य प्रयोग होणार आहे. याचं निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांनी आणि अनेक चाहत्यांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. इतकंच नव्हे तर मास्टर-ब्लाटर सचिन तेंडुलकरने देखील त्यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

सचिनने शेअर केली खास पोस्ट

या पोस्टमध्ये सचिनने प्रशांत दामले यांचा एक फोटो शेअर केला सोबतच फोटोवर कॅप्शन देखील त्याने लिहिलं आहे. त्यामध्ये सचिनने लिहिलंय की, “मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12,500 वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”

- Advertisement -

सचिनच्या या पोस्टवर प्रशांत दामले यांनी प्रतिक्रिया देत सचिनचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला प्रयोग
श्री षण्मुखानंद सभागृहात आज प्रशांत दामले यांचा 12,500 वा नाट्य प्रयोग पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याच्यासोबत यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.


हेही वाचा :

इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी, ऐतिहासिक चित्रपटांवरून संभाजीराजे कडाडले

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -