घरमनोरंजनदीपिका पादुकोणची प्रकृती खराब होताच प्रभासने घेतला मोठा निर्णय

दीपिका पादुकोणची प्रकृती खराब होताच प्रभासने घेतला मोठा निर्णय

Subscribe

शूटिंग दरम्यान जेव्हा दीपिका पादुकोणची प्रकृती अचानक खराब झाली तेव्हा अभिनेता प्रभासला खूप काळजी वाटू लागली. ज्यानंतर प्रभासने खूप मोठ्ठा निर्णय घेतला

साउथ सुपरस्टार प्रभास आपल्या दयाळूपणामुळे आणि मोठेपणामुळे ओळखला जातो. सध्या प्रभास आणि दीपिकाचा त्यांच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचं चित्रपटच्या शूटिंग दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे हृदयाचे ठोके वाढल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही वेळानंतर दीपिका पुन्हा शूटिंगसाठी सज्ज झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, शूटिंग दरम्यान जेव्हा दीपिका पादुकोणची प्रकृती अचानक खराब झाली तेव्हा अभिनेता प्रभासला खूप काळजी वाटू लागली. ज्यानंतर प्रभासने खूप मोठ्ठा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी दोन्ही कलाकारांचे सीन शूट काही प्रमाणात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र दीपिकाची अवस्था बघता प्रभासने रिशेड्यूल करायचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

 त्याने चित्रपटाच्या टीमला हा सीन एका आठवड्यानंतर रिशेड्यूल करण्याची मागणी केली. तसेच दीपिकाच्या तब्बेतीत सुधारणा झाली आणि ती व्यवस्थित ठिक झाली की तिला सीन शूट करण्याचा सल्ला दिला.तसेच प्रभासने पूर्ण निर्णय दीपिकावर सोपवला. प्रभासच्या या निर्णयामुळे चित्रपटाची टीमला खूप आश्चर्य वाटले. प्रभासच्या या मोठेपणामुळे पुन्हा एकदा लोकांचे मन जिंकले.

प्रभास आणि दीपिकाचा पहिला चित्रपट
खरंतर, प्रभास आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी प्रभासने बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सोबत ‘आदिपुरूष’ चित्रपटामध्ये काम केले आहे. दीपिकाने याआधी एका कन्नड चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायसोबत काम केले होते.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -