तुरुंगातून बाहेर येताच केआरकेने साधला ‘ब्रह्मास्त्र’वर निशाणा

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपटच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबाबत कमाल आर खानने ट्वीट केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला मागील काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता त्याची सुटका झाली असून तुरूंगातून बाहेर आल्या आल्या कमाल आर खानने पुन्हा एकदा चित्रपट निर्माता करण जौहरवर निशाना साधला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपटच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत कमाल आर खानने ट्वीट केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केआरके ने या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “मी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा समीक्षण केलं नाही परंतु तरीही लोक चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. यामुळे हा चित्रपट तर एक डिजास्टर चित्रपट झाला आहे.”

केआरके ने पुढे लिहिलंय की, “मी आशा करतो की, या चित्रपटाच्या अपयशाला करण जौहर मला जबाबदार ठरवणार नाही. जसं बॉलिवूडने बाकीच्या लोकांना ठरवलं आहे.” कमाल आर खानच्या ट्वीटवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. यांपैकी एका युजरने कमेंट करून लिहिलं की, “भाऊ आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, तू घाबरू नको. चित्रपटांचे समीक्षण करत राहा. नाहीतर आम्हाला वाटेल की, आम्ही चुकिच्या लोकांना सपोर्ट करतोय आणि हा बॉलिवूड गँगपासून सुरक्षित राहा”

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी कमाल आर खानला मुंबई पोलिसांनी एअरपोर्टवरून अटक केली होती. केआरकेवर एका अभिनेत्रीला चित्रपटामध्ये मुख्य भूमिका देण्यासाठी शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी आणि अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटावरून जहरी टिका केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपांमुळे केआरकेला अनेक दिवस तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगातून बाहेर येताच केआरकेने बॉलिवूडवर निशाणा साधायला सुरूवात केली होती की, मी बदला घेण्यासाठी परत आलो आहे. परंतु त्यानंतर त्याने काही वेळातच त्याचं हे ट्वीट डिलीट केलं होतं.


हेही वाचा :

आलिया भट्टचं होणार ग्रँड बेबी शॉवर; पण पार्टीत फक्त महिलांनाच एन्ट्री