घरमनोरंजनसुशांतने मला खूप काही शिकवलं... 'केदारनाथ'ला 4 वर्ष पूर्ण होताच साराने शेअर...

सुशांतने मला खूप काही शिकवलं… ‘केदारनाथ’ला 4 वर्ष पूर्ण होताच साराने शेअर केली पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे चर्चेत असते. शिवाय सारा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर सारा तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ वारंवार शेअर करत असते. दरम्यान, साराने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. खरंतर, 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटामधून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तिच्या सोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील मुख्य भूमिकेत होता. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचं जुन्या आठवणींना उजाळा देत साराने आज एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सारा अली खानने शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

- Advertisement -

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला आज चार वर्ष पूर्ण झाली. याचं जुन्या आठवणींना उजाळा देत साराने आज एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साराने सुशांत सिंह राजपूत, दिग्दर्शक आणि चित्रपटातील टीमसोबकतचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय खाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, “4 वर्षआधी माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. मला आजही ते स्वप्नचं वाटतं आणि कदाचित नेहमी तसंच राहिल. ते सर्व क्षण आणि शूट्स जगण्यासाठी मी ऑगस्ट 2017 मध्ये परत जाण्यासाठी काहीही करु शकते.”

सुशांतकडून खूप काही शिकले…
पुढे साराने लिहिलं की, “सुशांतकडून गाणं, चित्रपट, पुस्तकं, आयुष्य, अभिनय, चांदण्या, आकाश यांबद्दल बरंच काही शिकले. प्रत्येक उगवणार आणि मावळणार सूर्य पाहिला. नद्यांचा आवाज ऐकला. मॅगी आणि कुरकुऱ्यांचा आस्वाद घेतला. पहाटे चार वाजता उठून तयार होऊन गट्टू सरांच्या आदेशाचे पालन केले. आयुष्यभराच्या या आठवणींसाठी धन्यवाद.”

- Advertisement -

पुढे साराने लिहिलंय की, “जय भोलेनाथ, आजही जेव्हा संध्याकाळीा चंद्र चमकतो. तेव्हा मला ठाऊक आहे की, सुशांत वर आहे आपल्या आवडत्या चंद्राजवळ, एका चमकणाऱ्या ताऱ्यासारख्या, जो तो नेहमीच होता आणि राहिल. केदारनाथच्या एंड्रोमेडा पर्यंत.” सारा अली खानच्या या पोस्टवर सुशांतचे अनेक चाहते कमेंट्स करत आहेत.

2020 मध्ये झाला सुशांतचा मृत्यू
2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतचा वांद्रे येथील राहत्या घरात मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकजण वाद निर्माण झाला. काहींच्या मते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

2022 मध्ये सर्वाधिक सर्च झाला ‘ब्रह्मास्त्र’, यादीत टॉलिवूडच्या 5 चित्रपटांचाही समावेश

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -