Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळताच बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव

‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळताच बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव

Subscribe

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. ‘नाटू नाटू’ या गाण्याने 95 व्या ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, आणि धिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर, ऑल अॅट वन्स यांसारख्या गाण्यांना मागे टाकत इतिहास रचला आहे. दरम्यान, आता अनेकजण या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत आहेत. अशातच बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील सोशल मीडियावरुन RRR च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड कलाकारांनी केलं कौतुक

‘RRR’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.

- Advertisement -

jagran

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन टीमचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

अभिनेता अजय देवगणने देखील टीमचे कौतुक केले आहे. अजयने लिहिलंय की, “जसं म्हटलं जातं की चित्रपट जगभराची भाषा बोलतो. #RRR च्या टीमला शुभेच्छा”

अभिनेत्री कंगना रनौतने देखील तिच्या इंस्टाग्रामवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात तिने लिहिलंय की, संपूर्ण भारताला शुभेच्छा, “भेदभावाच्या आधारे भारतीयांचे दडपशाही, छळ, हत्या दाखवणारा चित्रपट. या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे.”

jagran

 


हेही वाचा :

‘नाटू-नाटू’ला ऑस्कर मिळवून देण्यात ‘या’ व्यक्तीचा मोलाचा वाटा

- Advertisment -