घरमनोरंजनदिवाळीचा सण येताच अनेकांना आठवण झाली अलार्म काकांची

दिवाळीचा सण येताच अनेकांना आठवण झाली अलार्म काकांची

Subscribe

‘उठ उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ दिवाळी आली की टिव्हीवर हमखास ही जाहीरात दिसते. ही जाहीरात दिसली नाही की, काहीसं सुन सुनं वाटातं. मागील अनेक वर्षांपासून दिवाळी आणी मोती साबण हे समीकरण एकच झालं आहे. शिवाय या मोती साबणासोबतच त्या जाहीरातीमधील अलार्म काका देखील घरोघरी पोहोचले. मात्र, यंदाच्या दिवाळीत जरी त्यांची जाहीरात असली तरी अलर्म काका आपल्या सोबत नाहीत. मोती साबणाच्या जाहिरातीतील ज्येठ्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचं गेल्या वर्षी 20 सप्टेंबरला निधन झालं.

कोण आहेत विद्याधर करमरकर?
मुंबईमधी विलेपार्लेमधील असणाऱ्या पार्लेश्वर सोसायटीमध्ये ते राहायचे. करमकर यांनी आपली सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमधली नोकरी संभाळून अभिनयाची कला जोपासली होती. ते नाटक, छोट्या-मोठ्या जाहीराती आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं.

- Advertisement -

कार्तिक कॉलिंग कार्तिक, सास बहू और सेन्सेक्स, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जिया, लंच बॉक्स’, ‘एक थी डायन, ‘एक व्हिलन’यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आजोबा, बाबा, वडील यांसारख्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय फक्त त्यांनी अभिनयच नाही तर अनेक कादंबऱ्या देखील लिहल्या आहेत. हुतात्मा राजगुरू यांचे चरित्रलेखन असलेले समर्पण, क्रंतिरत्न, जाणता अजाणता, पानितपत ही पुस्तकं लिहिली आहेत. यासह त्यांनी नाटक, मालिकांमध्येही त्यांनी लिखाण केले आहे.

‘लिनोवो कॉम्प्युटर्स’, ‘एशियन पेंट’ यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातींतूनही त्यांनी काम केले होते. मात्र सर्वाधीक प्रसिद्ध झाली ती म्हणजे त्यांची मोती साबणाची जाहीरात, सध्या मोती साबण यावर सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल होतात. आपली संस्कृती वारसा पुढे कशा प्रकारे घेऊन जाता येतो हे या जाहीरातीमधून मांडण्यता आले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

फेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने सांगितला धक्कादायक प्रकार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -