घरमनोरंजन'ऊंचाई' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ-अभिषेक पोहोचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

‘ऊंचाई’ चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ-अभिषेक पोहोचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई चित्रपट 11 नोव्हेंबर म्हणजेच आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन मुलगा अभिषेकला घेऊन प्रभादेवीतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमिताभ आणि अभिषेक एकत्र सिद्धिविनायकचे दर्शन घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये अमिताभ आणि अभिषकने पांढऱ्या रंगाचे ट्रेडिशनल कपडे परिधान केले आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.

- Advertisement -

‘ऊंचाई’मध्ये आहेत हे कलाकार

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेन्जोंगपा हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चौघांव्यतिरिक्त अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेत आहेत.अभिनेत्री परिणीती चोप्रा गाईडची भूमिका साकारताना दिसून येईल. चित्रपटामध्ये परिणीती ट्रेकिंग गाईड आहे. जी लोकांना ट्रेकिंगमध्ये येणाऱ्या संकटांबद्दल सांगते. या चित्रपटामध्ये परिणीती अमिताभ बच्चन यांच्या मित्रांना माऊंट एवरेस्टवर चढण्यासाठी मदत करते.

- Advertisement -

दरम्यान, अभिषेक बच्चन नुकतीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. ही सीरिज 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाली होती.

 


हेही वाचा :

अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या आगामी ‘ऊंचाई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -