घरमनोरंजनविराटने अनुष्कासाठी केलेल्या पोस्टवर कमेंट करताच वॉर्नर झाला ट्रोल

विराटने अनुष्कासाठी केलेल्या पोस्टवर कमेंट करताच वॉर्नर झाला ट्रोल

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर याने सुद्धा विराटच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. वॉर्नरच्या या कमेंटचावरून अनुष्काच्या चाहत्यांनी मात्र वॉर्नरला ट्रोल करण्यास सुरुवात केली पण त्यानंतर विराट कोहलीने कमेंट करून गोंधळलेल्या चाहत्यांना शांत केले.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने(virat kohali) अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मावर(anushaka sharma) प्रेम व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. विराटच्या पोस्टला सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर(david warner) याने सुद्धा विराटच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. वॉर्नरच्या या कमेंटचावरून अनुष्काच्या चाहत्यांनी मात्र वॉर्नरला ट्रोल करण्यास सुरुवात केली पण त्यानंतर विराट कोहलीने कमेंट करून गोंधळलेल्या चाहत्यांना शांत केले.

हे ही वाचा – किशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहली सुरू करतोय नवं रेस्टॉरंट

- Advertisement -

विराट आणि अनुष्का हे दोघेही एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. त्याच बरोबर विराट कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या पत्नीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. नुकतेच विराट कोहलीने “मेरा प्यार मेरी दुनिया” या कॅप्शनसह अनुष्का शर्मासाठी एक पोस्ट शेअर केली तेव्हा असेच काहीसे घडले. विराटची ही शैली चाहत्यांनाही खूप आवडली. काही वेळातच पोस्टवर लाखो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स आल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरही(david warner) विराटच्या या पोस्टवर कमेंट करण्यात मागे राहिला नाही आणि त्याने लगेचच ‘लकी मॅन, मेट’ अशी कमेंट केली. ही एक साधी कॉमेंट होती, पण काही ट्रोलर्सनी या कमेंटचा चुकीचा अर्थ काढत डेव्हिड वॉर्नरला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर वॉर्नरला स्पष्टीकरण द्यावे लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

हे ही वाचा – Anushka Sharma : अनुष्काचं सिनेसृष्टीत कमबॅक, साइन केले ३ बिग बजेट सिनेमे

वॉर्नरने एका चाहत्याला प्रश्न विचारत सांगितले की, मला असे म्हणायचे होते की आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत, आम्हाला सपोर्ट करणाऱ्या साथीदार मिळालया आहेत, तर एकीकडे चाहत्याला उत्तर देताना वॉर्नर म्हणाला की ही एक म्हण आहे जी आम्ही ऑस्ट्रेलियात वापरतो. जसे मी म्हणेन की मी कँडिस वॉर्नरसाठी भाग्यवान आहे. म्हणूनच जेव्हा आपण इतरांना हे म्हणतो तेव्हा असे म्हटले जाते की “तू भाग्यवान मित्र आहेस”. जेव्हा वॉर्नरने संपूर्ण प्रकरण स्पष्ट दिले तेव्हा अनेक त्याचेही अनेक चाहते त्याच्या समर्थनात पुढे आले. या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की, विराट कोहली(virat kohali) कमेंट करत म्हणाला ”मी माझ्या मित्राला ओळखतो”. त्यांनंतर हा सगळा गोंधळ शांत झाला.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -