HomeमनोरंजनAsha Bhosale : 'गुलाबी साडी' म्हणत थिरकल्या आशाताई

Asha Bhosale : ‘गुलाबी साडी’ म्हणत थिरकल्या आशाताई

Subscribe

आशा भोसले यांच्या आवाजाचा चाहता नाही असा माणूस शोधून सापडणं कठीण. वयाच्या 91 व्या वर्षीही आशाताईंचा उत्साह तरूण पिढीला लाजवेल असा आहे. 90 च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायलेली आहेत. ‘रेशमाच्या रेघांनी’सारख्या लावणीपासून ते ‘पिया तू अब तो आ जा’ सारख्या कॅब्रेपर्यंत अनेक प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी आजच्या युगातील ट्रेडिंग गाणी गाऊन सर्वांनाच थक्क केलं आहे.

2024 मध्ये ट्रेडिंग ठरलेलं संजू राठोडचं ‘गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. सैर्वसामान्यांपासून ते इन्स्टाग्राम इंफ्लुएर्स आणि मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर भरमसाठ रील्स तयार करण्यात आल्या. अनेकांना या गाण्याने अक्षरश: वेड लावलं. या गाण्याची क्रेझ परदेशातही होती. बॉलीवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत सर्वांनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं आपण या वर्षभरात पाहिलं आहे.

- Advertisement -

आता या गाण्याने चक्क आशा भोसलेंनाही भुरळ घातली आहे. नुकत्याच झालेल्या आशाताईंच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी संजू राठोडचं गुलाबी साडी हे गाणं गायलं. आणि सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आशाताईंनी या कार्यक्रमासाठी खास गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. गाणं गाताना त्यांनी गाण्यावरच्या हुबेहूब हुकस्टेप्स देखील केल्या. या गाण्यावर परफॉर्म करत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वयाच्या 91 व्या वर्षी त्यांची ही एनर्जी पाहून सगळेजण थक्क झाले आहेत. “अभिमानास्पद”, “हाच तो खरा क्षण आहे”, “सुंदर”, “या वयात नवीन गाणी आत्मसात करून गाणं ही मोठी गोष्ट आहे” अशा कमेंट्सचा पाऊस नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हिडीओवर पाडलाय. आणि त्यांचं भरभरून कौतुकही केलंय.

- Advertisement -

या कॉन्सर्टमध्ये आशा भोसलेंनी आणखी एक गाणं गायलं. ते म्हणजे 2024 मध्ये इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग ठरलेलं विकी कौशलचं ‘तौबा तौबा’ हे गाणं. या गाण्यावरही आशाताईंनी हूकस्टेप करत ठेका धरला होता. या गाण्याचा मूळ गायक करण औजला याने आशा भोसले यांचा ‘तौबा तौबा’ हे गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर करत ‘हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण’ असं कॅप्शन दिलं होतं.

हेही वाचा : Sai Tamhankar : सुपरस्टार सईने केली नव्या वर्षाची सुरुवात


Edited By – Tanvi Gundaye

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -