Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAshi Hi Jamva Jamvi : दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी, अशी ही जमवा जमवीचे पोस्टर प्रदर्शित

Ashi Hi Jamva Jamvi : दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी, अशी ही जमवा जमवीचे पोस्टर प्रदर्शित

Subscribe

चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या ‘राजकमल एंटरटेनमेंट’द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट ‘अशी ही जमवा जमवी’ लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. (Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie Poster Released)

नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर पाहून अतिशय खुमासदार आणि मनोरंजक अशा या गोष्टीबद्दल प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यांना ओमकार कुलकर्णी व तनिष्का विशे या नवीन जोडीसह सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची साथ लाभलेली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांची धमाल जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात हास्याचे वारे वाहणार, हे निश्चित. दोन दिग्गज एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. ‘थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी’ अशी ही अनोखी गोष्ट लोकेश गुप्ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत.

संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव, राहुल शांताराम यांनी मनोरंजन विश्वात काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे. सिनेमाच्या आकर्षक शीर्षकावरून रंजक कथेची कल्पना येते. आता ही जमवा जमवी नक्की कसली, कोणाची आणि कशाप्रकारे होणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. जे 10 एप्रिल 2025 रोजी कळेलच, कारण याच दिवशी ‘राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात आपल्या भेटीला येणार आहे.

हेही पहा –

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, रिॲलिटी शो होस्ट करणार