एमटीव्ही रोडीजमध्ये आशिष भाटिया आणि नंदिनी ठरले ‘अल्टिमेट चँपियन्स’

दक्षिण आफ्रिकेतील रोमांचक परिसरातील अनेकआठवड्यांच्या घडामोडींनंतर बडी जोडी आशिष भाटिया आणि नंदिनी हे नवीनसीजनचे ‘अल्टीमेट चँपियन्स’ ठरले आहेत

भारतातील सर्वांत मोठा साहस रिअलिटी टेलिव्हिजन शोअसलेल्या ‘एमटीव्ही रोडीज-जर्नी इन साउथ आफ्रिका’ मध्ये पहिल्यांदाच एक नाही तर दोन सर्वोच्च विजेते मिळालेआहेत! आव्हाने, एलिमिनेशन्स, नाट्यमय वळणं आणि दक्षिण आफ्रिकेतील रोमांचक परिसरातील अनेकआठवड्यांच्या घडामोडींनंतर बडी जोडी आशिष भाटिया आणि नंदिनी हे नवीनसीजनचे ‘अल्टीमेट चँपियन्स’ ठरले आहेत. लक्षवेधीसुपरस्टार आणि समाज सेवक सोनू सूद हॉस्ट असलेल्या ह्या सीजनची फिनाले अतिशयथरारक लढत होती, कारण सर्व फायनलिस्टसनी हे विशेष प्रतिष्ठेचे पद प्राप्तकरण्यासाठी शर्थीची झुंज दिली होती! केप टाऊनमधील प्रसिद्ध व्हिक्टोरिया आणि आल्फ्रेड (व्हीअँड ए) जलाशयाजवळ ह्या अनेक शहरांमधील मोहीमेची सांगता झाली.

सर्वोत्तमविरुद्ध सर्वोत्तम अशी लढत झालेल्या ग्रँड फिनाले ‘रेस टू द टॉप’ मध्ये असाधारणडावपेच, निश्चय आणि दृढतेची गरज होती. फायनलिस्टसबडी जोड्या केव्हीन अल्मासिफर-मूस जट्टाना, युक्तीअरोरा- जसवंत बोपन्ना, गौरवअलुग- सिमी तलसानिया आणि आशिष भाटिया- नंदिनी ह्यांना एका अनपेक्षित व तब्बल 4 टप्पेअसलेल्या खडतर रॉडीज शैलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले व केप टाऊनच्या रमणीयशहराजवळच्या त्यांच्या वाटचालीमध्ये धक्कादायक ट्विस्टस होते. नाट्यमयसस्पेन्सनंतर आशिष आणि नलिनी त्यांनी कष्टाने जिंकलेल्या मुकुटाचा ताज स्वीकारतानासमोर आले! विजेत्यांच्या जल्लोषामध्ये सहभागी होताना हॉस्ट सोनूसूदनेही लाईव्ह साउथ आफ्रिकन संगीताच्या तालावर ठेका धरला.

पहिल्यांदाच पूर्णपणे आंतरराष्ट्रीय ठिकाणी शूटझालेल्या व दक्षिण आफ्रिकेतील खडतर भूप्रदेशामध्ये झालेल्या ह्या सीजनमध्येसुरुवातीपासूनच रोमांच पुरेपूर होता! खडतर कामे आणि अनपेक्षित सहका-यांसोबत मैत्री होण्यासाठी कँपफायर सत्रांपासून एड्रनालीन उसळून वरयेणारी आव्हाने आणि स्पर्धकांमधील संवादापर्यंत ह्या थरारक प्रवासामध्ये वेड्यासाहसाची सर्वोत्तम उदाहरणे होती! इन- गेम पॉईंटप्रणाली आणि नवीन ‘बडी जोड्या’ संकल्पनेसह ह्या ब्रँड न्यू फॉरमॅटला शोच्या सततवाढणा-या चाहत्यांनीविलक्षण यशस्वी केले. पिपपिम मीडीया प्रा. लि.ची निर्मितीअसलेल्या एमटीव्ही रोडीज जर्नी इन साउथ आफ्रिकामध्ये नवीन प्रकारच्या साहसाचीपरंपरा व अनपेक्षित व धक्कादायक पद्धतीच्या मनोरंजनाची मालिका पुढेही सुरू राहिली!


हेही वाचा :‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजमध्ये भारत गणेशपुरेंची दमदार एन्ट्री