Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन आशिष विद्यार्थीने दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

आशिष विद्यार्थीने दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आशीष विद्यार्थी सध्या फार चर्चेत आहे. खरंचर अभिनेत्याने वयाच्या 60 व्या वर्षी दुसरे लग्न केलंय. त्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. आशीषने कोलकाता मध्ये राहणाऱ्या रुपाली बरुआ सोबत लग्न केलयं. या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी आशीष आणि रुपाली यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान आशीषची पहिली पत्नी राजोशी उर्फ पीलू हिने आपल्या इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

राजोशीची ही क्रिप्टक पोस्ट पाहता तिला याचे फार वाईट वाटल्याचे कळतेय. तिने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, एक योग्य व्यक्ती कधीच तुम्हाला असा प्रश्न विचारणार नाही की, तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. ते असं काहीच करत नाहीत ज्याबद्दल त्यांना माहिती असते की, ते केल्याने तुम्हाला दु:ख होईल. हे नेहमीच लक्षात ठेवा.

- Advertisement -

राजोशीने पुढे असे लिहिले की, मी अपेक्षा करते की ओवरथिंकिंग आणि संशय आता तुमच्या डोक्यातून निघून जाईल. कंफ्युजनऐवजी तुम्हाला स्पष्टता येईल. अशी अपेक्षा करते की, शांति आणि आनंदाने तुमचे आयुष्य भरुन जाईल. तुम्ही दीर्घकाळ स्ट्राँन्ग रहाल, आता आशीर्वाद मिळवण्याची वेळ आली आहे. तुम्ही ते सर्व डिजर्व करता.

- Advertisement -

राजोशीची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. यावर खुप युजर्स ही कमेंट्स करत आहेत. तर राजोशी आणि आशीष यांना एक 23 वर्षाचा एक मुलगा आहे. अशातच वडिलांच्या दुसऱ्या लग्नाने मुलाला ही धक्का बसलाय.


हेही वाचा- अबब! वयाच्या 60 व्या वर्षी ‘या’ खलनायकाने केला दुसरा विवाह

- Advertisment -