Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन स्वतःचा आनंद स्वतः निवडला... दुसऱ्या लग्नानंतर ट्रोल झालेल्या आशिष विद्यार्थींनी दिलं ट्रोलर्सला...

स्वतःचा आनंद स्वतः निवडला… दुसऱ्या लग्नानंतर ट्रोल झालेल्या आशिष विद्यार्थींनी दिलं ट्रोलर्सला उत्तर

Subscribe

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआसोबत लग्न केले. या वयात दुसरं लग्न केल्यामुळे अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. तर काहीजण त्यांची खिल्ली देखील उडवत आहेत. ट्रोलर्सकडून मिळणाऱ्या या नकारात्मक प्रतिक्रियांवर आता आशिष विद्यार्थी यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

आशिष विद्यार्थींनी घेतली ट्रोलर्सची शाळा

आशिष विद्यार्थी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या दुसऱ्या लग्नाबाबत भाष्य केलं. यात ते म्हणाले की, “मी म्हातारा, मूर्ख यांसारखे अनेक अभद्र शब्द ऐकले. परंतु या सगळ्यात मजेदार गोष्ट अशी की, अशा सर्व कमेंट आपल्या सारख्या लोकांमधूनच आल्या आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, ते त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीवर कमेंट करत आहेत. असं करुन ते स्वतःलाच दरीत ढकलत आहेत. कारण एक दिवस ते देखील म्हातारे होणार आहेत.” असं आशिष विद्यार्थी म्हणाले.

- Advertisement -

पुढे आशिष विद्यार्थी म्हणाले की, “आम्ही स्वतःलाच म्हणतो, अरे ऐक, ही गोष्ट करु नको कारण, तू म्हातारा झाला आहेस. म्हणजे याचा अर्थ असा की, आपण असेच नैराश्याने मरावे. जर कोणाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर तो जाऊ शकत नाही का? मी आणखी म्हातारा झाल्यावर कोणीही माझी काळजी घ्यायला येणार नाही. प्रत्येकाला स्वतःसाठी काहीतरी करण्याचा अधिकार आहे, कारण शेवटी स्वतःचा आनंद स्वतः निवडला पाहिजे.”

दरम्यान, आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी, गुवाहाटी येथील रहिवासी आहे आणि ती एक उद्योजिका आहे. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअरही आहे. आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ आसामची आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘गदर’चित्रपटाच्या निर्मात्यांची खास ऑफर; तिकिट असणार Buy 1 Get 1 Free

- Advertisment -