घरमनोरंजनभारतमातेच्या सुपुत्राची आई... विवेक अग्निहोत्रींसह अशोक पंडित यांनी वाहिली श्रद्धांजली

भारतमातेच्या सुपुत्राची आई… विवेक अग्निहोत्रींसह अशोक पंडित यांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री 3.30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथीलयू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय तसेच कला क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी देखील ट्ववीटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत हीराबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

विवेक अग्निहोत्रींनी वाहिली श्रद्धांजली

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्ववीटर अकाऊंटवर नरेंद्र मोदी आणि त्यांत्या आईचा फोटो शेअर करत लिहिलंय की, “पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनावर माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. भारत मातेच्या सुपुत्राची आईचे कर्मयोगी जीवन आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरेल. शत कोटी प्रणाम, ओम शांती.”

- Advertisement -

अग्निहोत्री यांच्या व्यतिरिक्त चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी देखील ट्वीटर अकाऊंटवरुन शोक व्यक्त केला आहे. हीराबेन यांच्या अंत्ययात्रेचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय की, “आदरणीय हीराबेन मोदी यांनी एका वीर कर्मयोगी पुत्राला जन्म दिला आहे ज्याने देशाला एक रस्ता दाखवला आहे. अशा महान आत्म्याची अंत्ययात्रा त्यांच्या मुलाने त्यांना खांद्यावर घेऊन अग्निमध्ये समर्पित केले! ‘काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धी ने’- हीराबेन यांना शत कोटी प्रणाम!”

 


हेही वाचा :

ईश्वर पंतप्रधानांना या कठीण प्रसंगी… कंगनाने वाहिली मोदींच्या आईला श्रद्धांजली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -