घरमनोरंजन'व्हॅक्यूम क्लीनर' नाटकादरम्यान रंगणार अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा

‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकादरम्यान रंगणार अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा

Subscribe

मराठी चित्रपट आणि नाष्टसृष्टीचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी यावर्षी वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अभिनय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच अवचित्य साधत ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्थेकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून अशोक सराफ यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सध्या अभिनेते अशोक सराफ ‘अष्टविनायक’ संस्थेच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात प्रमुख भूमिका साकरत आहेत. या नाटकाचा शनिवार, ४ जून रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता नाटकाचा प्रयोग होणार आहे. तसेच या प्रयोगा दरम्यान अशोक सराफ यांचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या नाटकामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री निर्मिती सावंत यांची सुद्धा मुख्य भूमिका आहेत. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. खरंतर हा विशेष सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. गेल्या चार वर्षांपासून अशोक सराफांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाचे आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त प्रयोग महाराष्ट्रासोबतच , गोवा, इंदूर यांसारख्या ठिकाणी झाले आहेत.

 

- Advertisement -

 


हेही वाचा :http://Akshay Kumar च्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला मोठा धक्का; ‘या’ देशांमध्ये चित्रपटावर घालण्यात आली बंदी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -